आता HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचे पगार, 1 कोटींपर्यंत आहे विमा कवच

| Updated on: Oct 22, 2020 | 6:48 AM

एक्सिस बँकेता एमओयू 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बँकेचे प्रस्ताव आले होते. यामुळे आता नव्या बँकेची निवड करण्यात आली आहे.

आता HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचे पगार, 1 कोटींपर्यंत आहे विमा कवच
Maharashtra Police Bharti 2019
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) आणि मंत्रालीयन कर्मचाऱ्यांचे पगार आता एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी मुंबई पोलिसांना एक्सिस बँकेतून (Axis Bank) पगार (Salary) यायचा पण आता HDFC बँकेतून पगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एक्सिस बँकेता एमओयू 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बँकेचे प्रस्ताव आले होते. यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्यात आली आहे. (now HDFC Bank will give salary to Mumbai Police and Ministry staff)

HDFC बँकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक देणार आहे.

धक्कादायक, पुण्याच्या बायोटेक कंपनीत ड्रग्जचं रॅकेट, 20 कोटींच्या ड्रग्जसह 12 जणांना अटक

एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे पोलिसांना अशा प्रकारे मदत मिळणं म्हणजे आनंदाची बाब आहे. कारण, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस दिवसभर काम करत आहेत. पण पोलीस हे आपले रक्षक असले तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पोलीस विभागाकडून करण्यात आला होता.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, परवानगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात एन्ट्री नाही

इतकंच नाही तर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts), असा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिक चौकशी सुरू केली होती.

(now HDFC Bank will give salary to Mumbai Police and Ministry staff)