Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन मिळताना दिसणार आहे.

Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
wine
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 5:59 PM

मुंबई: राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी वाइन सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या भाजपवरही (bjp) त्यांनी टीकास्त्र सोडलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळेल

छोटे शॉपस निर्माण करून त्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे. गोव्यात आणि हिमाचलात भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपने वाइन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा

मंत्रिमंडळात नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा झाली. माशेलकर समितीने रिपोर्ट दिला होता. त्यावर चर्चा झाली. राज्यातील शिक्षण प्रणाली पाच विभागात आहे. आता मंत्रिमंडळाचा गट तयार करण्यात येईल आणि शिफारशींचा अभ्यास करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर – गिरीश महाजन

Video: ज्या टिपू सुलतानवर भाजप-सेनेत राडा होतोय, त्याच्याबद्दल राष्ट्रपती कोविंद नेमकं काय म्हणाले होते? काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट

Maharashtra News Live Update : आता किराणा दुकान, सुपर मार्केमध्ये वाईन मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय?

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.