आजपासून राज्यातील तब्बल 20 हजार नर्सचं कामबंद आंदोलन! रुग्णसेवा कोलमडण्याची भीती

| Updated on: May 26, 2022 | 7:33 AM

Maharashtra Nurse Protest News : राज्यातील परिचारीकांचं कामबंद आंदोलन, 20 हजार परिचारीका कामबंद आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता, राज्यातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती

आजपासून राज्यातील तब्बल 20 हजार नर्सचं कामबंद आंदोलन! रुग्णसेवा कोलमडण्याची भीती
परिचारीकांचा आंदोलनाचा इशारा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : राज्यातील तब्बल 20 हजार नर्सेसनी (Nurse Protest) आंदोलन पुकारंय. तब्बल 20 हजार नर्स आजपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा कोलडण्याची भीती आहे. विविध मागण्यासाठी राज्यातील नर्स (Maharashtra Nurse News) आंदोलन करणार आहेत. सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्स संघटनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून कामबंद आंदोलन (Protest News) केल्यानंतर येत्या काळात हे नर्सचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसेवेर परिणाम होण्याचीदेखील शक्यता आहे. प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनावर तातडीनं तोडगा निघाला नाही, तर 28 मे (सोमवारपासून) बेमुदत आंदोलनाचा इशारा नर्स संघटनांनी दिला आहे.

काय आहेत मागण्या?

नर्ससाठीची अनेक पदं रिक्त आहेत. ही पदं न भरल्याकारणानं सध्या सेवेत असलेल्या नर्सवर अतिरीक्त ताण पडत असल्यानं नर्सेसमध्ये नाराजी आहे. तातडीनं रिक्त पदं भरुन नर्सेसवर पडत असलेला ताण दूर करावा, अशी मागणी नर्स संघटनेकडून केली जाते आहे. दरम्यान, सरकारच्या तोंडी आश्वासनावर विश्वास नसल्याचंही नर्सेसनी म्हटलंय. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळून अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, इशारा नर्सेसनी दिलाय.

Video : भीषण अपघात

हे सुद्धा वाचा

23 मे ते 25 मे या दरम्यान, दररोज एक तास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय या संघटनेनकडून घेण्यात आला होता. राज्याच्या वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आता आजपासून पूर्णवेळ कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

70 टक्के पदं रिक्त

सध्याच्या घडीला फक्त 30 टक्के नर्स रुग्णसेवा देत आहेत. सरकारी मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांसर सरकारी दवाखान्यात असलेल्या नर्सची संख्या तुटपुंजी असल्याचं नर्सेसचं म्हणणंय. रिक्त असलेली 70 टक्के पदं तातडीनं भरली जावीत, अशी मागणी नर्स संघटनेकडून केली जाते आहे. सरळ सेवा भरती करण्याची मागणी आंदोलक नर्सेसकडून करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडून नर्सिंग भत्ता मिळावा यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.