Nyasa : आमच्या कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न, पुणे पोलिसांना संशयितांची नावं दिली, न्यासाच्या सीईओचा दावा

आरोग्य भरतीच्या (Health Department) "क" विभागाची आणि ड विभागाची भरती परीक्षा घेण्याचं कंत्राट असलेल्या न्यासा (Nyasa) कंपनीचा सीईओ पुनीत कुमार (Punit Kumar) यानं आमच्या कंपनीविषयी अफवा पसरवण्याचं काम सुरु असल्याचं म्हटलं आहे.

Nyasa : आमच्या कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न, पुणे पोलिसांना संशयितांची नावं दिली, न्यासाच्या सीईओचा दावा
पुनीत कुमार
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 6:36 AM

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आरोग्य भरतीच्या (Health Department) “क” विभागाची आणि ड विभागाची भरती परीक्षा घेण्याचं कंत्राट असलेल्या न्यासा (Nyasa) कंपनीचा सीईओ पुनीत कुमार (Puneet Kumar) यानं आमच्या कंपनीविषयी अफवा पसरवण्याचं काम सुरु असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या भरतीच्या “क” विभागाची परीक्षा झाली आहे आणि “ड” विभागाच्या परीक्षा संदर्भात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. पुणे पोलिसांकडून (Pune Police ) तपास सुरू आहे. या संबंधी आरोग्य विभाग जे निर्णय घेईल ते आम्हांला मान्य असेल, असं पुनीत कुमार यानं सांगितलं आहे.

कंपनीला कंत्राट कसं मिळालं?

आमच्या कंपनीला डबल वेरीफाय केलं आहे आणि महा आयटी कडून आणि हायकोर्टाकडून आमच्या कंपनीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी झालेली आहे. आणि त्यानुसारच आम्हाला ही परीक्षा घेण्याचा कंत्राट मिळालेले होतं. आमच्या कंपनी सोबत सगळ्या पाच कंपनीला काम राज्य सरकार कंत्राट दिली होती आणि आमच्या कंपनीच्या बाबतीत अफवा पसारवण्याचं काम केलं जातं आहे.

24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर ला जवळपास 8 लाख विद्यार्थांनी परीक्षा दिल्या आहेत आणि ही परीक्षा अत्यंत योग्य पद्धतीने पार पडलेली आहे. परंतु, आरोग्य विभागाच्या “ड” विभागाच्या परीक्षेमध्ये पेपर फुटलेले होते. त्या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत आणि त्यावरून सत्य जे काय आहे ते बाहेर पडेल.

वेगवेगळ्या ठिकाणचं प्रवेशपत्र कसं?

विद्यार्थी एका पोस्ट साठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून फॉर्म भरत असतात त्यामुळे जे ऍडमिट कार्ड विद्यार्थी ज्या कॅडरमध्ये भरत असतात त्याच कॅडरला त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे लागत असतं आणि दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना का परीक्षा देण्यासाठी जाव्या लागतात यासाठी आरोग्य विभागाकडून एक माहिती सुद्धा त्यावेळी देण्यात आलेली होती…

कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न

दलालांच्या प्रकरणासंदर्भात आमच्या कंपनीशी काही संबंध नाही. आमच्या कंपनीला बदनाम करण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. यामधून सत्य लवकरच बाहेर येईल आणि यातून आमची कंपनी अजून मजबूत होईल. पेपर फुटी प्रकरणासंदर्भात जे लोक कार्यरत आहेत त्यांना पकडणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही सुद्धा अनेक संशयित लोकांची नावं पुणे पोलिसांना या प्रकरणांमध्ये दिलेली आहेत, असं पुनीतकुमारनं सांगितलं.

आमच्या कंपनीचे आणि कोणत्याही मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे संबंध नाहीत. तपासात हे संपूर्ण बाहेर येईल आणि आमच्या कंपनी मधील प्रत्येक व्यक्ती या संपूर्ण तपासातून योग्य पद्धतीने मुक्त होतील अशी आम्हाला खात्री आहे, असल्याचं देखील पुनीत कुमारनं सांगितलं.

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 88 वर, ठाकरे सरकार नियमावली जाहीर करणार

Nagpur Omicron | ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडला; प्रशासन अलर्ट झोनमध्ये

Nyasa company CEO Puneet Kumar claim the gave some names of accused to Pune Police in Health Department Recruitment Scam

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.