ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून 2 मार्चची तारीख, भुजबळ म्हणतात की…

छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. आमच्या बाजूने निकाल येईल, अशी आशा आहे.ट्रिपल टेस्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, आता बुधवारी सुनावणी असल्याने पुन्हा दोन दिवस वाट बघावी लागेल.

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून 2 मार्चची तारीख, भुजबळ म्हणतात की...
सुप्रीम कोर्टात 2 मार्चला सुनावणी, पत्रकार परिषदेत काय म्हणाले भुजबळ?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:30 PM

नवी दिल्लीः अख्ख्या महाराष्ट्राचे (Maharashtra) डोळे लागून राहिलेल्या ओबीसी आरक्षणावरची (OBC Reservation) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी, 2 मार्च रोजी यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील 27 टक्के राजकीय आरक्षणाची महाराष्ट्र सरकारने काढलेली अधिसूचना रद्द केली. तसेच कसलिही आकडेवारी गोळा न करता राज्यात राजकीय आरक्षण लागू केल्याचे ताशेरे ओढले. मात्र, आता राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कंबर कसली असून, त्यासाठीचा आवश्यक तो डेटा जमा केल्याचा दावा केलाय. शिवाय या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने जुना आदेश मागे घेत राजकीय आरक्षण लागू करण्याची मागणी केलीय.

पुन्हा निर्णयाची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेरश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या पीठासमोर ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीचे प्रकरण आले होते. तेव्हा त्यांनी या आरक्षणावर बंदी आणली. मात्र, या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने एक याचिका दाखल केली. त्यावर 19 जानेवारी रोजी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा चेंडू राज्य मागासवर्ग आयोगाकडे टोलावला. सरकारला आयोगाकडे ओबीसीचा डेटा जमा करण्याचे आदेश दिले. आयोगाने याची चौकशी करावी, अशा सूचनाही दिल्या. आता राज्य सरकराने 8 फेब्रुवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे ही आकडेवारी दिलीय. शिवाय सर्वोच्च न्यायालयातही एक अहवाल दिल्याचे समजते. आता यावर बुधवारी न्यायालय काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.

भुजबळ म्हणतात 100 टक्के अपेक्षा

छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. आमच्या बाजूने निकाल येईल, अशी आशा आहे.ट्रिपल टेस्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, आता बुधवारी सुनावणी असल्याने पुन्हा दोन दिवस वाट बघावी लागेल. मला 100 टक्के अपेक्षा आहे की, निकाल आमच्या बाजूने येईल. इम्पेरिकल डेटा दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आयोगाकडे द्यायला सांगितले आहे. आम्ही आयोगाकडे डेटा दिल्याचे ते म्हणाले.

तर सर्वांनाच अडचण

भुजबळ म्हणाले की, अंतरिम अहवालात ओबीसी लोकसंख्या 38 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. आयोगानेही लोकसंख्या 38 टक्के असताना 27 टक्के आरक्षण द्यायला हरकत नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने सरकारने सुप्रीम कोर्टात जावे अस म्हटले. मात्र, दुर्दैवाने निकाल विरोधात आला, तर देशातील सर्व राज्यांना याच अडचणीतून जावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.