Mumbai Trans Harbour Link | टोलच्या रांगेपासून सुटका, शिवडी-न्हावा शेवा पुलावर कसं होणार हायटेक ORT टोल कलेक्शन?

Mumbai Trans Harbour Link | शिवडी-न्हावा शेवा पुलावर टोल कलेक्शन एकदम युनिक पद्धतीने होणार आहे. जगातील अत्यंत हायटेक अशी ओपन रोड टोलिंग सिस्टिम या मार्गावर अवलंबण्यात येणार आहे. ORT म्हणजे काय? त्याचे फायदे काय? या सिस्टिममध्ये टोल कलेक्शन कसं होतं?

Mumbai Trans Harbour Link | टोलच्या रांगेपासून सुटका, शिवडी-न्हावा शेवा पुलावर कसं होणार हायटेक ORT टोल कलेक्शन?
mumbai trans harbour sea link bridge sewri nhava sheva
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:34 AM

Mumbai Trans Harbour Link | आज देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी MTHL शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाच उद्घाटन करणार आहेत. सिव्हिल इंजिनिअरींगचा उत्कृष्ट उदहारण असलेल्या या पुलाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी येथून चालू होणारा हा ब्रिज रायगड तालुतक्यातील उरण येथील न्हावा शेवा गावात संपणार आहे. एकूण 21.8 किलोमीटर लांबीचा हा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक आहे. या ब्रिजचा 16.50 किमीचा मार्ग समुद्रात आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर आहे. अटल सेतू हा 6 पदरी सागरी ब्रिज आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रिजच आज उद्धाटन होत आहे. उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या ब्रिजवरुन प्रवास करुन अनुभव घेणार आहेत. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाच अंतर अवघ्या 20 मिनिटावर येणार आहे.

अटल सेतूवरुन सर्वच वाहनांना प्रवासाची परवानगी असणार नाही. दुचाकी, मोपेड, तीन चाकी वाहन, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि धीम्या गतीने धावणाऱ्या वाहनांना या ब्रिजवर प्रवेश नसेल. फक्त चारचाकी वाहनांना या सागरी पुलावरुन प्रवास करता येईल. या ब्रिजमुळे फक्त अंतरच कमी होणार नाहीय, तर बरच काही बदलणार आहे. दोन मोठी शहर जवळ आल्यामुळे हा ब्रिज अन्य दृष्टीने सुद्धा गेमचेंजर ठरणार आहे.

कुठल्या देशात आहे, ओपन रोड टोलिंग सिस्टिम

शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलावर टोलिंगची अत्याधुनिक पद्धत असणार आहे. अत्यंत हायटेक पद्धतीने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल कलेक्शन होईल. या ब्रिजवर ORT म्हणजे ओपन रोड टोलिंग असणार आहे. ओपन रोड टोलिंगला कॅशलेस आणि इलेक्ट्रॉनिक टोलिंग सुद्धा म्हणतात. सध्या ओपन रोड टोलिंग सिस्टिम सिंगापूरमध्ये सुरु आहे.

ORT टोलिंग म्हणजे काय?

ORT टोलिंगमध्ये वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत उभ रहाव लागत नाही किंवा टोल भरण्यासाठी वाटेत कुठलाही अडथळा उभारला जात नाही. हायवे ला तुम्ही ज्या वेगाने गाडी चालवताय, तोच वेग कायम ठेवता येतो. ORT टोलिंगमध्ये कुठेही स्पीड कमी करण्याची आवश्यकता भासत नाही. तुम्ही त्याच वेगान गाडी चालवू शकता. टोल बूथवर वाहनांची भली मोठी काही किलोमीटरपर्यंत रांग असते. ORT सिस्टिममध्ये अशी कुठलीही रांग असणार नाही. अटल सेतूवर अत्याधुनिक स्कॅनर्स आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते या मार्गावरुन वेगात पळणाऱ्या वाहनांना हेरुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल कलेक्शन करतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.