Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची महापूजा, कसा असेल मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा

रविवारी पहाटे आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या एका मेळाव्यालाही मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा हा एकूण दौरा कसा असेल त्याच्यावर एक नजर टाकूयात

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची महापूजा, कसा असेल मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार महापूजाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:39 PM

मुंबई- राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठीच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीहून विमानाने पुण्यात दाखल झाले. पुण्याहून ते बायरोड पंढरपूरच्या (Pandharpur)दिशेने निघाले आहेत. रविवारी पहाटे आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या एका मेळाव्यालाही मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा हा एकूण दौरा कसा असेल त्याच्यावर एक नजर टाकूयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

रात्री ९.३० – पुणे विमानतळावरुन पंढरपूरकडे रवाना रात्री ९.४५ – हडपसरमध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार रात्री ११.३० – पंढरपुरात शासकीय विश्रागमृहात होणार दाखल पहाटे २ – विठ्ठलाच्या महापूजेसाठी रवाना होणार पहाटे २.३० – विठ्ठलाची सपत्नीक महापूजा पहाटे ०५.३० – इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन पहाटे ५.४५ – नदीघाटाचे लोकार्पण सकाळी ६.४५ – शासकीय विश्रागृहात आगमन सकाळी ११.१५ – सुंदर माझे कार्यालय स्पर्धेचे बक्षीस वितरण सकाळी ११.४५ – स्वच्छता दिंडी कार्यक्रम समारोप दुपारी १२.३० – शिवसेना मेळाव्यास उपस्थिती

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदाच महापूजेचा मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळतो आहे. थपथविधी झाल्यानंतर त्यांनी आषाढी एकादशीला महापूजेचा मान आपल्याला मिळणार असल्याचं सांगत, हा आपला सन्मान असल्याचे सांगितले होते. पंढरपुरात वारकरी आणि आषाढी एकादशीच्या तयारीचा त्यांनी आढावाही घेतला होता. गणपतीप्रमाणेच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफची घोषणाही त्यांनी केली होती. मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सुरु होतानाच त्यांना पहिल्यांदाच विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे.  पंढरपुरातील नव्या प्रकल्पांसाठी ते उद्या काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तसेच आषाढीच्या दौऱ्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.