Aaditya Thackeray: एकीकडे पूरस्थितीत पूरग्रस्तांचे हाल, दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

राजकरणाच्या बळी पडू नका, आणि जिथे पूर परिस्थिती आहे, तिथे लोकांना मदत करा. असे आवाहन युवासेनेला केल्याचेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

Aaditya Thackeray: एकीकडे पूरस्थितीत पूरग्रस्तांचे हाल, दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 10:42 PM

मुंबई – एकीकडे महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती (Flood Situation)आहे, पूरग्रस्त आणि नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र फोडाफोडी आणि राजकारणात मग्न आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी केली आहे. सरकारमध्ये काय सुरु आहे, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. प्रशासनावर कोणाचे लक्ष नाही, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. कोणत्याही विभागात मंत्री नाही, अशी टीका करत त्यांनी राज्यकर्त्यांना धारेवर धरले आहे. आपल्याला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही, असे सांगत, या परिस्थितीत महाराष्ट्रात कोणी काम करत असेल तर ती शिवसेना काम करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. राज्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दिल्लीत शिवसेनेतील 12 खासदारांची केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर ही टीका केली आहे.

युवासेनेला पूरस्थितीत मदतीचे आदेश

राज्यात राजकीय परिस्थिती काहीही असली, तरी युवासेना आणि शिवसेनेनं आपली कामे थांबवलेली नाहीत, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. राजकरणाच्या बळी पडू नका, आणि जिथे पूर परिस्थिती आहे, तिथे लोकांना मदत करा. असे आवाहन युवासेनेला केल्याचेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. आपल्या सरकारच्या काळात अनेक विकासकामे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाचा राग-आदित्य

या बंडखोर आमदारांचा उद्धव ठाकरेंवर, ठाकरे परिवारावर आणि शिवसेनेवर राग आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते जरी आमचा राग करत असले, तरी आमच्या मनात त्यांच्याबाबत राग नसल्याचे आदित्य म्हणाले. त्यांच्याबाबत दुःख आहे की, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. असा कोणी पक्ष फोडून गट तयार करत असेल तर हा लोकशाहीला थोका आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना लढायचेच आहे तर त्यांनी त्यांनी राजीनामा द्याावा आणि निवडणुकांना सामोरं जावं, असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला केले आहे. निवडणुकीच्या मैदानात जनतेचा फैसला आम्हाला मान्य असेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदल ही सर्कस

राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदल ही सर्कस असल्याचे सांगत त्यांनी त्यावर टीका केली आहे. ज्या खासदारांना जायचे आहे त्यांनी जावे, आपण त्यावर काहीही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले. निष्ठावंत शिवसैनिक आजही आपल्यासोबतच आहेत असे आदित्य ठाकरे म्हणालेत. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आम्ही जे काही केलं, ते तुम्ही पाहिलं असेल, असेही ते म्हणाले. हे जे राजकरण सुरू आहे युवकांना पटत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.