बदलापुरात केमिकल कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

आगीमुळे कंपनीतील बराच सामान जळून खाक झाला असून एका कामगाराचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत.

बदलापुरात केमिकल कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 10:42 AM

ठाणे : बदलापूर एमआयडीसीतील के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर आजूबाजूचा परिसर अक्षरक्ष: हादरला. स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली (Fire in Badlapur chemical company). आगीमुळे कंपनीतील बराच सामान जळून खाक झाला.

के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत आज सकाळी (22 जानेवारी) नऊ वाजता ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज आला. दरम्यान, या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले (Fire in Badlapur chemical company). जवानांनी कंपनीत अडकलेल्यांना बाहेर काढले. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले. दोघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी पालघरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए. एन. के. फार्मा कंपनीतही असाच स्फोट झाला होता. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. स्फोट हा इतका भीषण होता की याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. सुरुवातीला या परिसरात भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र, नंतर एका कंपनीत स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटानंतर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.