मुंबई : लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांना नोकरीचे, वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. वसईमध्ये असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसईतील दोन जणांची अशाच प्रकारे 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. (Online fraud by showing job lure in Vasai)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नोकरी असल्याचं आमिष दाखवून किंवा मी वकील बोलत आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी बरोबर काम केलं नाही. त्यामुळे आमचं नुकसान झालं. तुमच्यावर गुन्हा दाखल करू, कोर्टात खेचू अशी भीती दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं वसईत उघड झालं आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकरीच्या शोधात अनेकांनी क्विकर जॉबसारखे अप्लिकेशन किंवा जॉब मिळवून देणाऱ्या ज्या ऑनलाईन कंपनी आहेत त्या कंपनीकडे नोकरीसाठी अप्लाय केलं आहे. वसईतील तरुण-तरुणींनी सुद्धा अशाच प्रकारे अप्लाय केलं होतं. मयूर संजय चमनकर यांनी ही क्विकर जॉब या अप्लिकेशनवर नोकरीसाठी अप्लिकेशन केलं होतं. त्यानंतर त्यांना कंपनीकडून फोन आला.
यावेळी कंपनीने सुरवातीला 49 रुपये भरण्यास सांगितले. मयूरने नोकरीसाठी तातडीने पैसे भरले आणि त्यांना एक ऑनलाईन लिंक पाठवली गेली. त्या लिंकमध्ये सर्व माहिती भरत असतानाच त्यांच्या खात्यातून तब्बल 1 लाख 99 हजार तात्काळ काढण्यात आले. यासंबंधी मयूरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
असंच आणखी एक प्रकरण नायगाव परिसरात समोर आलं. 19 वर्षाच्या मुलीला वर्क फ्रॉम होम करण्यासाठी काम पाहिजे का? असा फोन करून एकाने विचारणा केली. तरुणीला 3 दिवस कामही दिलं. पण लगेच तिला कंपनीचा वकील बोलतोय असा फोन करून तू आमच्या कंपनीचं काम खराब केलं. आमचं नुकसान झालं आहे. आता तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. 17650 रुपये उकळले. याप्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
इतर बातम्या –
‘उद्धव ठाकरे भेटण्यासाठी टाळटाळ करत आहेत’; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुलीचा आरोप
Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य
(Online fraud by showing job lure in Vasai)