BMC: प्रशासक आल्यानंतरही नालेसफाई 36 टक्के, यंदाही मुंबईची तुंबापुरी होणार?

BMC: महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नालेसफाई संदर्भात आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.

BMC: प्रशासक आल्यानंतरही नालेसफाई 36 टक्के, यंदाही मुंबईची तुंबापुरी होणार?
प्रशासक आल्यानंतरही नालेसफाई 36 टक्के, यंदाही मुंबईची तुंबापुरी होणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 10:47 AM

मुंबई: यंदाचा पावसाळा मुंबईकरांची (mumbai) परीक्षा पाहणारा ठरणार आहे. मुंबई पालिकेची (bmc) मुदत 7 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (iqbal singh chahal) यांनी 162 कोटी रुपयांची नालेसफाईची कामे मंजूर केली आहेत. 15 मे पर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण होईल असे आदेश देण्यात आले आहेत. एकूण 2 लाख 51 हजार 610 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. परंतु सध्यस्थितीत केवळ सरासरी 36 टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे यंदाही मुंबईची तुंबापुरी होण्याची भीती वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीने वेळेत मान्सून पूर्व तयारी पूर्ण होईल का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

पावसाळा तोंडावर आला असूनही मुंबईतील नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मुंबई शहरातील नालेसफाई 18 टक्के झाली आहे. तर पूर्व उपनगर नालेसफाई 44 टक्के झाली आहे. पश्चिम उपनगरात 36 टक्के नालेसफाई झाली आहे. मुंबईत एकूण 36 टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुंबईची यंदाही तुंबापुरी होणार का? असा सवाल केला जात आहे. सध्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महापालिकेवर पहिल्यांदाच प्रशासक नेमण्यात आला आहे.

दोनदा नालेसफाईची पाहणी करा

समाधानाची बाब म्हणजे मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. 4 मे पर्यंतच्या आकडेवारी नुसार स्पष्ट झाले आहे. पालिका आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्तांना आठवड्यातून दोनदा आपल्या हद्दीतील नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. शहर भागातील माटुंगा रेल्वे स्थानकासह दादर टि.टी., हिंदु कॉलनी आदी भागांमध्ये पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दादर-धारावी नाल्याच्या सफाईला अद्यापही सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे नेहमी पाणी भरणाऱ्या या भागातील नालेसफाईचे काम महापालिका युद्धपातळीवर हाती घेणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

आजच्या बैठकीत काय होणार?

दरम्यान, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी नालेसफाई संदर्भात आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी महापालिका अधिकारी आणि कामचुकार कंत्राटदार यांची महापालिका आयुक्त हजेरी घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पावसाळ्याला अवघे काही दिवस बाकी असल्याने नालेसफाईच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.