VIjay Wadettiwar meet Eknath Shinde | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींवरुन वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे नेते एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. पण दुसरीकडे ते एकमेकांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत.

VIjay Wadettiwar meet Eknath Shinde | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 7:55 PM

मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय किंवा वडेट्टीवार नेमकं कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या भेटीला सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महत्त्व प्राप्त झालंय.

विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत येण्याआधी विरोधी पक्षनेते होते.  अजित पवार यांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झालीय. महाविकास आघाडीने वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक केलीय. असं असताना त्यांनी आज अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.

विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकरांच्या भेटीवर टीका

“सगळा महाराष्ट्र बघतोय. यांची जाण्याची वेळ झालीय. आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ, त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं परवावर ढकललं गेलं. पण तिरडी तयार आहे. फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जीवंत ठेवलेलं आहे. व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार”, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर आता ते स्वत: काही तासांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.