महायुतीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षाच्या या नेत्यांना आमंत्रण, कोण-कोण येणार?

राज्यात महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार आहे. यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे यायचं की कोत्या मनासारखं राहायचं असा टोला भाजप नेत्याने लगावला आहे.

महायुतीच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षाच्या या नेत्यांना आमंत्रण, कोण-कोण येणार?
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 10:30 PM

मुंबईत येण्याआधीच भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री भाजपचाच असेल. अर्थात त्यांनी निवड करण्याआधीच फडणवीसांचं नाव घेणं टाळलं. पण आझाद मैदानात फडणवीसांच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. सकाळी 11 वाजता भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भाजप नेते विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत गटनेता म्हणून फडणवीसांची निवड केली जाईल आणि अधिकृतपणे देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषणा होईल तर आझाद मैदानात शपथविधी सोहळा ग्रँड होणार आहे.

सोमवारी भाजपच्या नेत्यांनीच पाहणी केली होती. त्यावरुन केसरकरांनी आम्हाला माहितीच नव्हतं, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा पाहणी केली. चंद्रशेखर बावनकुळेंसह गुलाबराव पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंनी आणि शिरसाटही हजर होते.

शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शाह, जेपी नड्डा, नितीन गडकरींसह 9 केंद्रीय मंत्री आणि 19 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अरुणाचले मुख्यमंत्री पेमा खांडू आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी

19 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांना निमंत्रण जाणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण दिलं जाणार आहे.

आता निमंत्रण दिल्यावर यायचं की कोत्या मनासारखं राहायचं, हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला. नेत्यांसह साधू संत महतांचीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असेल.

नाणीजचे नरेंद्र महाराज भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज, राधानाथ स्वामी महाराज गौरांगदास महाराज महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज कीर्तनकार प्रसाद महाराज अंमळनेरकर समाज प्रबोधनकार मोहन महाराज जैन आचार्य लोकेश मुनी

2014 मध्ये वानखेडे स्टेडियमवर फडणवीसांच्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा पार पडला होता. त्यावेळी पूर्ण 5 वर्षे फडणवीसच मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीच्या प्रयोगात राजभवनातच शपथ घेण्यात आली आणि आता तिसऱ्यांदा ऐतिहासिक आझाद मैदानावर फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.