VIDEO: विरोधकांची विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा, सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. (opposition mlas hold parallel assembly in maharashtra assembly premises)
मुंबई: तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपने थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. (opposition mlas hold parallel assembly in maharashtra assembly premises)
विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला. हे सरकार जुल्मी सरकार आहे. वसुली सरकार आहे. हे भ्रष्टाचारी सरकरा आहे. त्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच या अभिरुप विधानसभेत काही सदस्य बोलणार असून त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
विखे-पाटलांची टीका
फडणवीस जागेवर बसल्यानंतर अध्यक्ष कोळंबकर यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचं नाव पुकारलं. विखे-पाटलांनी सुमारे दहा ते पंधरा मिनिटं भाषण केलं. हे सरकार चर्चेतून पळ काढत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी घेणंदेणं नाही. लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम करण्याचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप करतानाच विखे-पाटलांनी या सरकारचा निषेध नोंदवला. त्यानंतर जयकुमार गोयल यांनी भाषणाला सुरुवात करत राज्य सरकारच्या निलंबनाच्या कारवाईवर जोरदार टीका केली. त्यानंतर हरिभाऊ बागडे यांनीही या चर्चेत भाग घेऊन सरकारवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री जागचे हल्लेच नाही
1985 साली शरद पवार विरोधी पक्षनेते होते. तेव्हा काळ्या ज्वारीचा प्रश्न आला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी व्यासपीठावर जाऊन अध्यक्षाची खुर्ची हलवली होती. त्यावेळी शंकरराव जगताप अध्यक्ष होते. त्यांना जागेवरून हटवले. पण तरीही आमदारांना निलंबित केलं नाही. पण काल संजय कुटे यांनी केवळ माईक हलवला. फेकून दिला नाही. तरीही त्यांना निलंबित करण्यात आलं. गोंधळाची परिस्थिती झाल्यावर त्यांनी पाच ते दहा मिनिटं सभा तहकूब करायची असते. अध्यक्षाच्या दालनात विरोधकांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणायची असते. मात्र, काल त्यांनी आमदारांना निलंबित करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी ते कारण शोधत होते. सभागृहात गोंधळ झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी उभं राहून परिस्थिती निवळायची असते. पण आमचे मुख्यमंत्री हललेच नाही. अर्ध पुतळा ठरावा असं मुख्यमंत्री बसले होते, अशी टीका हरिभाऊ बागडे यांनी केली. मुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे प्रमुख असतात. त्यामुळे सभागृहाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम त्यांनी करायचं असतं, असं ते म्हणाले. (opposition mlas hold parallel assembly in maharashtra assembly premises)
संबंधित बातम्या:
VIDEO: भास्कर जाधव हे नरकासुर आणि सोंगाड्या; नितेश राणेंचा हल्लाबोल
(opposition mlas hold parallel assembly in maharashtra assembly premises)