AC local: एका बाजूला विरोध, दुसरीकडे प्रवाशांच्या संख्येत इतक्या पटींनी वाढ, मध्य रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद?

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना एसी लोकलमुळे सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येते आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी-2022 मधील दैनंदिन सरासरी 5,939 प्रवाशांवरून ऑगस्ट-2022 मध्ये 41,333 प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास 7 पटीने ही संख्या वाढली आहे.

AC local: एका बाजूला विरोध, दुसरीकडे प्रवाशांच्या संख्येत इतक्या पटींनी वाढ, मध्य रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद?
एसी लोकलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 4:41 PM

मुंबई – मुंबईच्या उपनगरीय रेल्वे (Mumbai local)म्हणजे लोकल या मुंबईच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जातात. दररोज लाखो नागरिक या लोकलमधून मुंबईत आणि मुंबईतून परत उपनगरांत प्रवास करीत असतात. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर काही महिन्यांपूर्वी एसी लोकल (Air condition local)सुरु करण्यात आल्या. त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, या लोकलच्या विरोधात उद्रेकही पाहायला मिळतो आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसटीवरुन सुरु झालेल्या एसी लोकलला विरोध करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवर तीन वेळा प्रवाशांनी आंदोलन केले. त्यानंतर गर्दीच्या वेळी या लोकल बंद करण्यात आल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Avhad)यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिवा, मुंब्रा, कळवा या रेल्वे स्टेशनवर होत असलेल्या वाढत्या गर्दीत एसी लोकलची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या एसी लोकलची गरज आहे का, याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेवरील एसी लोकलला गेल्या सहा-सात महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

एसी लोकल प्रवाशी संख्येत सात पटींनी वाढ

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना एसी लोकलमुळे सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येते आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी-2022 मधील दैनंदिन सरासरी 5,939 प्रवाशांवरून ऑगस्ट-2022 मध्ये 41,333 प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास 7 पटीने ही संख्या वाढली आहे.

ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही एसी लोकलची टॉप 3 स्टेशन

सध्या, मध्य रेल्वे 56 वातानुकूलित लोकलसह एकूण 1810 उपनगरीय सेवा चालवते. एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. प्रवाशी संख्येत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही टॉप 3 स्टेशने असल्याचेही सांगण्यात येते आहे.

हे सुद्धा वाचा

फेब्रुवारी 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वातानुकूलित लोकलच्या प्रवासांची संख्या- टॉप 3 स्थानके ठाणे-10,50,511 डोंबिवली-9,39,431 आणि कल्याण-9,01,859 इतकी आहे.

एसी लोकलबाबत मध्य रेल्वे ठाम?

मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे आणि वातानुकूलित लोकल चालवणे ही त्यापैकी एक आहे. वातानुकूलित लोकलला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.