Heavy Rain: अतिवृष्टीतील मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश; एनडीआरएफच्या 13 टीम तैनात; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

मुंबईः राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief Minister Eknath Shinde) यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष दिले आहे. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) (National Disaster Management Force)आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. […]

Heavy Rain: अतिवृष्टीतील मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश; एनडीआरएफच्या 13 टीम तैनात; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
एनडीआरएफच्या टीमला मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 2:47 PM

मुंबईः राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief Minister Eknath Shinde) यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष दिले आहे. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) (National Disaster Management Force)आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या 9 आणि एसडीआरएफच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

अमरावतीत काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस

राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद

आज दुपारी 12 वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100 मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात मुंबई कुलाबा येथे 117 मिमी तर सांताक्रूझ येथे 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील 2 नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. व वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्थानिक बचाव पथके कार्यरत

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.