ऊन, वारा, पावसातही संप सुरूच… 22 दिवस एसटी ठप्प, 8195 निलंबित, 1827 कर्मचाऱ्यांना काढले; विलीनीकरणावर चाक अडलेलेच!

गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतरही हा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार अडून बसले आहेत.

ऊन, वारा, पावसातही संप सुरूच... 22 दिवस एसटी ठप्प,  8195 निलंबित, 1827 कर्मचाऱ्यांना काढले; विलीनीकरणावर चाक अडलेलेच!
msrtc strike
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 12:48 PM

मुंबई: गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतरही हा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 8195 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, 1827 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

गेल्या 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आझाद मैदानात हे कर्मचारी एकवटले आहेत. राज्यातील विविध भागातून हे कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. महिला कर्मचारी सुद्धा मुलं लेकरांना सोडून आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत विलणीकरण होत नाही तो पर्यंत जाणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. आज मुंबईत पाऊस पडत आहे तरी एसटी कामाचारी निर्णयावर ठाम असून मैदानात ठाण मांडून आहेत. ऊन असो की पाऊस… कितीही मोठं तुफान आलं तरी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे कर्मचारी पाऊस पडत असल्यामुळे ताडपत्री लावून बसले आहेत. अन्न, पाणी देखील वेळेवर मिळत नाही तरी देखील त्रास सहन कार्याला आम्ही तयार आहोत. पण विलीनीकरण होईपर्यंत हटणार नाही, असं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्गातील सातही डेपो ओस

सिंधुदुर्गात एसटीचे एकूण सात डेपो आहेत. मात्र या सातही डेपोतून गेल्या 22 दिवसात एकही एसटी सुटलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लग्न सराईचे दिवस असल्याने ग्रामस्थांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.

नागपुरात 400 कर्मचारी निलंबित

नागपुरात आणखी 20 संपकरी कर्मचाऱ्यांचा काल निलंबन करण्यात आलं. त्यामुळे नागपुरातील निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 400वर गेली आहे. या आधीच 90 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. नागपुरात एसटी बंद असल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच आज तेलंगणा राज्यातील एक बस दाखल झाली. मात्र नागपूर आगारातील बस सुटली नाही. सरकारने मागण्या मान्य केल्यास लालपरी रस्त्यावर लवकर धावू शकते. मात्र सकारात्मक तोडगा काढावा असं मत कर्मचारी व्यक्त करत आहेत.

नंदूरबारमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय

नंदूरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू केल्या असल्या तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना एसटीचा संपाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी दुर्गम भाग असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचण्यासाठी सर्वात महत्त्वाची जबाबदारीही एसटीची असते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेतील पटसंख्येवरही एसटी संपाचा परिणाम दिसून आला आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाली असली तरी एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाल्याचं चित्र आज पाहायला मिळाले.

सोलापुरात 14 कर्मचारी कामावर

सोलापुरात काल दिवसभरात फक्त सात बसेस धावल्या. सोलापूर विभागात केवळ 14 चालक-वाहक कामावर परतले. तर पुण्यात काल 22 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यात लालपरी सुरू नसल्याने खासगी, शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. जळगावातही संपामुळे 22 दिवसांपासून एकूण 49 बसेस जागेवर थांबून आहेत. त्यामुळे संपातील 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

निलंबन, सेवा समाप्ती सुरूच

दरम्यान, आंदोलनावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. काल 610 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 8195 कर्मचारी निलंबित झाले आहेत. तर काल 80 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा समाप्त झालेल्यांची कर्मचाऱ्यांची संख्या 1827 झाली आहे.

तेलंगणात काय घडलं?

दरम्यान, तेलंगणा राज्यात तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात आलेले नाही. तेलंगणातील कर्मचाऱ्यांनीही विलीनीकरणासाठी 53 दिवस संप केला होता. 53 दिवस संपाच्या कालावधीत 32 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. परंतु तरीही विलीनीकरण झालेले नाही, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातही एसटीचं विलीनीकरण होणार का? याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.

73 हजार कर्मचारी अजूनही संपावर

राज्यात एसटीचे एकूण 92 हजार 266 कर्मचारी आहेत. त्यापैकी काल 19 हजार ८६ कर्मचारी कामावर हजर होते. तर अजूनही 73 हजार 180 कर्मचारी संपात आहेत.

कोणत्या विभागीतील किती कामगार संपावर

>> एसटीतील प्रशासकीय विभागात 9 हजार 426 कर्मचारी आहेत. त्यापैकी 9 हजार 53 कर्मचारी कामार आले आहेत. तर 373 कर्मचारी संपात आहेत.

>> कार्यशाळा विभागात एकूण 17 हजार 560 कर्मचारी आहेत. त्यापैकी 5 हजार 488 कर्मचारी कामावर परतले आहेत. तर 12 हजार 72 कर्मचारी संपात आहेत.

>> एसटीत 37 हजार 225 चालक आहेत. त्यापैकी 2 हजार 271 चालक कामावर आले आहेत. तर 34 हजार 954 चालक संपात आहेत.

>> तसेच एसटीत एकूण 28 हजार 55 वाहक असून त्यापैकी 2 हजार 274 वाहक कामावर आले आहेत. तसेच 25 हजार 781 वाहक संपात आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO: बापरे! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा प्रवाशांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनचा अहवाल सात दिवसात येणार

फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल

धक्कादायक! गेल्या पाच वर्षात 6 लाख भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.