Pahalgam Terror Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध; राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी साधा थेट संपर्क
Helpline Number for tourists stranded in Kashmir : काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या ठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
काश्मीरमधील संपर्क क्रमांक:




श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397 00000
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक
कश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी अडकलेल्या पर्याटकांच्या मदतीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.
दुरध्वनी क्रं. 02472/227301 Email id:- rdelosmanabad@gmail.com
तर नागरीकांसाठी खालील प्रमाणे हेल्पलाईन्स श्रीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन
श्रीनगर येथील संपर्क क्रमांक
फोन-0194-2463651/2457543/2483651
Whats App No. 7780805144/7780938397/7006058623
धाराशिव जिल्हयातील कोणतेही नागरीक कश्मीर येथे अडकले असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे केले आवाहन
जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव फोन-02472-225618/227301 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.
मो. नंबर- 9665031744
अमरावती पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक
पहेलगाव मध्ये अडकलेल्या अमरावती मधील लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अमरावतीच्या कक्षात टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप तर लवकरच त्यांना आपल्या घरी परत आणू अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. 100 पेक्षा जास्त पर्यटक अमरावती जिल्ह्यातील कश्मीरमध्ये अडकले आहेत
जिल्हा नियंत्रण कक्ष अमरावती 0721 2662025,
निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर मोबाईल क्र.9421747777
सुरेंद्र रामेकर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी 9545463450
पुण्यातील पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक
पुण्यातील नातेवाईक, पर्यटकांनी पुणे कंट्रोल नंबर 9370960061 / 02026123371 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.