Parambir singh letter bomb : शरद पवारांनाही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली, परमबीर सिंगांच्या पत्रातील 10 मोठे मुद्दे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोठ्या गौप्यस्फोट केले आहेत.

Parambir singh letter bomb : शरद पवारांनाही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली, परमबीर सिंगांच्या पत्रातील 10 मोठे मुद्दे
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:16 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोठ्या गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. यात थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिल्याचा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केलाय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रातील 10 मोठे मुद्दे खालीलप्रमाणे (Parambir singh letter bomb 10 important points from letter of Ex Mumbai CP to CM Uddhav Thackeray).

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील 10 मोठे मुद्दे

1. IPS परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं.

2. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

3. सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.

4. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर 100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं.

5. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.

6.  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या भेटीनंतर सचिन वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

7. काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते.

8. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40-50 कोटी रुपये 1750 बार,हॉटेल मधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

9. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे.

10. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

संबंधित बातम्या :

Pramvir singh letter : अनिल देशमुखांच्या कारनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांसह पवारांनाही माहिती दिली होती- परमबीर सिंग

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

Anil Deshmukh Parambir Singh | अंबानी आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी परमबीर सिंहांपर्यंत धागेदोरे, अनिल देशमुखांचा पलटवार

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ पाहा :

Parambir singh letter bomb 10 important points from letter of Ex Mumbai CP to CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.