6 नगरसेवकांच्या प्रवेशाने परभणीत ताकद वाढली, यवतमाळचा माजी आमदार फोडला, राष्ट्रवादीचे एकाच दिवशी 2 दणके!

राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. आज परभणीच्या सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. तर तिकडे यवतमाळच्या अर्वी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला.

6 नगरसेवकांच्या प्रवेशाने परभणीत ताकद वाढली, यवतमाळचा माजी आमदार फोडला, राष्ट्रवादीचे एकाच दिवशी 2 दणके!
राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 4:14 PM

मुंबई :  राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. आज परभणीच्या सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्यासह 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं. तर तिकडे यवतमाळच्या अर्वी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्या पुढाकाराने आज बंजारा समाजाचे नेते आणि सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादीत कुणाकुणाचा पक्षप्रवेश?

दरम्यान, चंद्रकांत राठोड यांच्यासमवेत सोनपेठ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जिजाबाई चंद्रकांत राठोड, नगरसेविका योजना दिगांबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिगांबर भाडुळे पाटील, नगरसेविका नलिनी विनोद चिमनगुंडे, सौ. चंद्रकला भिमराव तिरमले, कुरेशी जुलेखाबी जिलाणी, राज सैदाबी जहीर, शेख मेराजबी इनुस, सदस्य रमाकांत राठोड, निलेश चंद्रकांत राठोड यांनी देखील पक्षात प्रवेश केला.

परभणीत पक्षाची ताकद वाढणार

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान राजेश विटेकर यांनी परभणीत पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे असे सांगितले होते. आज तो दिवस आला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

बंजारा समाजासाठी राज्य सरकारच्या अनेक योजना राबवू

बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या एका चांगल्या नेत्याचा आपल्या पक्षात प्रवेश झाला आहे. भविष्यात बंजारा समाजासाठी राज्यसरकारच्या अनेक योजना राबवू, असेही जयंत पाटील यांनी आश्वासित केले. सोनपेठ नगरपरिषद अधिक बळकट करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

राठोड यांच्या पक्षप्रवेशाने बालेकिल्ला मजबूत झाला- मलिक

परभणी जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील विकासाची कामे पक्षाच्या माध्यमातून आपण नक्की करू. राठोड यांच्या पक्ष प्रवेशानंतर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. तसेच ज्या मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश

यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला.

दिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राजू तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, याचा आनंद वाटतोय, असेही जयंत पाटील म्हणाले.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परभणीचे नेते राजेश विटेकर, परभणी जिल्ह्याचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

(parbhani Banjara Community leader Chandrakant Rathod and 6 Corporaters join NCP)

हे ही वाचा :

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.