शेतात नाही तर मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर करतायं जेवण, Video व्हायरल कारण…
Mumbai AirPort | मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी धावपट्टीवर बसून जेवण केल्याचा हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओनंतर इंडिगो कंपनी आणि मुंबई विमानतळाला नोटीस दिली गेली आहे. प्रवाशांना योग्य सुविधा न दिल्याबद्दल ही नोटीस आहे.
मुंबई, दि.16 जानेवारी 2024 | तुम्ही ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, पण शेतात जेवणाचा आनंद घेतलाच असणार…निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाची चव अधिकच चांगली वाटते आणि आपण आर्धी पोळी जास्त खातो. परंतु मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर जेवणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी मध्यरात्रीच अधिकाऱ्यांची बैठक घेत हजेरी घेतली. या बैठकीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाने इंडिगो एअरलाईन्स आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
काय आहे प्रकार
इंडिगोचे कंपनीचे विमान १४ जानेवारी रोजी गोव्यावरुन दिल्लीकडे जात होते. विमान काही अडचणींमुळे दिल्लीला न जाता मुंबईला वळवण्यात आले. हे विमान उड्डाणास १२ तासांहून अधिक तास लागले. त्यामुळे प्रवाशी कमालीचे वैतागले. प्रवाशांनी विमानातून थेट खाली उतरत धावपट्टीवर ठाण मांडले. जेवण धावपट्टीवर सुरु केले. एखाद्या गार्डनमध्ये किंवा शेतात बसून काही खातो त्याप्रमाणे चक्क विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवाशी जेवत होते.
Dinner on Airport runway#MumbaiAirport pic.twitter.com/ycvYhZyFgc
— jitendra (@jitendrazavar) January 16, 2024
मुंबई विमानतळाचं स्पष्टीकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले की, “इंडीगो 6E 2195 गोवा ते दिल्ली विमान प्रतिकूल हवामानामुळे वळवण्यात आले होते. त्यानंतर विमान पुन्हा गोव्यात उड्डाणाला आधीच बराच उशीर झाला. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले.” दरम्यान सोशल मीडियावर या प्रकारासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
In a viral video, passengers of a Delhi-bound IndiGo flight diverted to Mumbai (confirmed by airport sources) due to operational issues are seen eating and sitting on the airport tarmac at Mumbai Airport.
(Screengrabs from viral video) pic.twitter.com/xNdiW7HqUv
— ANI (@ANI) January 15, 2024
प्राधिकरणाकडून नोटीस
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाकडून नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कंपन्या परिस्थितीचा अंदाज आला नाही. प्रवाशांसाठी विमानतळावर योग्य सुविधा दिल्या नाही. प्रवाशांना विश्रांती कक्ष आणि अल्पोपहार यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या नाहीत. विमानाला कॉन्टॅक्ट स्टँडऐवजी रिमोट C-33 देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढला.
हे ही वाचा
पुणे विमानतळावर गोंधळ, सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त वाढवला, काय आहे कारण