शेकाप नेत्याने 18 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप

नवी मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली शेकापचा नेता श्रीराग कमलासनन उर्फ श्री याला नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी श्रीराग कमलासननच्या लॅपटॉपमधून 560 हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो, व्हिडीओही जप्त करण्यात आले. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी कारवाई केली. श्रीराग कमलासनन उर्फ श्री हा नवी मुंबईतील उल्वे परिसरात राहतो. शेकापच्या केरळ […]

शेकाप नेत्याने 18 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली शेकापचा नेता श्रीराग कमलासनन उर्फ श्री याला नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी श्रीराग कमलासननच्या लॅपटॉपमधून 560 हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो, व्हिडीओही जप्त करण्यात आले. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नवी मुंबईच्या एनआरआय पोलिसांनी कारवाई केली.

श्रीराग कमलासनन उर्फ श्री हा नवी मुंबईतील उल्वे परिसरात राहतो. शेकापच्या केरळ सेलचा श्रीराग कमलासनन अध्यक्ष आहे.

घटना उघडकीस कशी आली?

नवी मुंबईतील उल्वे येथे राहणाऱ्या महिलेची श्रीराग कमलासनन उर्फ श्री याच्याशी रिअल इस्टेच्या कामानिमित्त ओळख झाली. 2017 साली श्रीरागने महिलेला त्याच्या कार्यालयात बोलावलं. श्रीरागने महिलेला उल्वे येथे नोकरी करण्यास सांगितले. उल्वेतच आपल्या मुलाची शाळा असल्याने महिलाही तिथे येऊन राहू लागली आणि नंतर रिअल इस्टेटच्या व्यावसायातही उतरली. याचवेळी श्रीराग आणि महिलेमधील जवळीक वाढली. श्रीरागने महिलेची संपूर्ण माहिती गोळा केली आणि लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार करु लागला.

श्रीराग महिलेला मारहाणही करायचा, तसेच मुलाचं अपहरण करण्यची धमकीही द्यायचा. त्यामुळे भीतीपोटी महिलेने कधीच पोलिसात किंवा कुठेच तक्रार केली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून 4 फेब्रुवारी रोजी महिलेने एनआरआय पोलिस ठाण्यात श्रीरागविरोधात तक्रार दाखल केली.

लॅपटॉपमध्ये 560 नग्न महिलांचे फोटो-व्हिडीओ

श्रीरागच्या कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. तिथे एक लॅपटॉप सापडला. त्यातून 560 हून अधिक महिलांचे अश्लिल फोटो जप्त करण्यात आले.

श्रीरागवर काय कारवाई करण्यात आली?

या प्रकरणात आतापर्यंत 18 पीडित महिला समोर आल्या आहेत, ज्यांच्यावर श्रीरागने बलात्कार केला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी 5 फेब्रुवारीला श्रीरागला अटक करुन कोर्टात हजर केलं. कोर्टाने श्रीरागला पोलिस कोठडी सुनावली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.