सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद, 24 तासांत हजारो अर्ज

सिडकोची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच तब्बल तब्बल १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद, 24 तासांत हजारो अर्ज
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 10:49 PM

सिडकोची बहुप्रतिक्षित योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच तब्बल तब्बल १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. गृहनिर्माणाच्या क्षेत्रात सिडको महामंडळावर जनतेचा असलेला अतूट विश्वास या योजनेद्वारे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ ऑक्टोबर २०२४ ला वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)च्या या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. सदर योजनेचे संकेतस्थळ https:\\.cidcohomes.com असून नागरिक या योजनेस उत्तम प्रतिसाद देत आहेत.

नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७००० घरांची महायोजना साकारली जात असून, या गृहनिर्माण योजनेतील पहिल्या टप्प्यांतील २६००० घरे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि मेट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत.

याशिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. या महायोजनेच्या नोंदणीला लाभत असलेल्या भरघोस प्रतिसादावरून सिडकोने गृहनिर्माणाच्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानावर जनतेने पुन्हा एकदा केलेले शिक्कामोर्तब केले आहे.

‘या’ सोडतीची वैशिष्ट्ये काय?

  • अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल.
  • या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
  • योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.