35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच मते मागणार पीयूष गोयल, लोकलमधून प्रवास करत…
Mumbai lok sabha election 2024 | उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून पीयूष गोयल यांना भाजपने उमदेवारी दिली आहे. तब्बल 35 वर्षांनी पीयूष गोयल निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी लोकलमधून प्रवास करत लोकांशी संवाद साधला.
मुंबई | 15 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून पीयूष गोयल यांना उमदेवारी जाहीर केली आहे. तब्बल 35 वर्षांनी पीयूष गोयल निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यासाठी अगदी लोकलमधून प्रवास करत आहेत. दादर ते बोरिवली असा प्रवास करुन त्यांनी लोकांशी संपर्क साधला. पीयूष गोयल यांचे आई-वडील भाजपमध्येच होते. परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षांत निवडणूक लढवली नव्हती. आता भाजपने मोदी सरकारमधील नवरत्नांना राज्यसभेऐवजी लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोयल यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
पीयूष गोयल यांचा लोकल प्रवास
उमेदवारी जाहीर होताच पीयूष गोयल यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. 14 मार्च रोजी पीयूष गोयल यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार होते. या प्रवासात त्यांनी लोकांशी संवाद साधला. यासंदर्भात आशीष शेलार यांनी ट्विट केले आहे. आता उत्तर मुंबईमधील 17 लाख मतदार पीयूष गोयल त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.
आमचे महायुतीचे उमेदवार श्री. पीयूष गोयल जी यांच्यासोबत मुंबई लोकलने दादर ते बोरिवली पर्यंत प्रवास केला. @PiyushGoyal pic.twitter.com/HTl6JRSDHB
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) March 14, 2024
आई-वडील राजकारणात
पीयूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश दोन दशके राजकारणात होते. अटलबिहारी सरकारमध्ये ते मंत्री होते. भाजपचे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. त्यांची आई चंद्रकांता गोयल आमदार होती. घरातून राजकीय पार्श्वभूमी मिळाल्यानंतर पीयूष गोयल 1990 च्या दशकात भाजपाशी जोडले गेले. पक्षात विविध पदावर काम करत त्यांना 2010 रोजी राज्यसभेची संधी मिळाली. सलग तीन वेळा ते राज्यसभेतून खासदार झाले. भाजपमध्येच नाही तर विरोधी पक्षात त्यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील नेते ते आहेत.
एलईडी बल्बचे यश
2014 से 2017 मध्ये पीयूष गोयल रिन्यूबल एनर्जी मिनिस्टर होते. त्यावेळी त्यांनी एलईडी बल्ब वितरण योजना आणली. ते वाणिज्य मंत्री असताना भारताने संयुक्त अरब अमीरात (युएई) सोबत खुले व्यापार धोरण सुरु केले. ‘मेक इन इंडिया’ साठी त्यांनी मोठे काम केले आहे. 2014 मध्ये पीयूष गोयल यांनीच ‘नमो टी’ मोहीम सुरु केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांपर्यंत पोहचले.