क्रीडांगणाचा हा Video पाहिल्यावर तुम्हाला कळेल,आयडियाची देशात कमी नाही, आनंद महिंद्राही झाले खूश
मुंबईत तयार झालेल्या या क्रीडांगणाची कल्पना उद्योगपती आनंद महिंद्रा यांना जाम आवडली. मग नेहमीप्रमाणे त्यांनी प्ले ग्राउंडचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला अन् लिहिले आपण असे प्रत्येक शहरात करु या. जागेचा प्रश्न सोडवणारी काय आहे ही आयडिया...
मुंबई : देशात आयडियाची कमतरता नाही. ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंत अनेक जुगाड केले जातात. नावीन्यपूर्ण आयडिया असली की प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्राही त्याला ट्विट करणे सोडत नाही. महिंद्रा यांच्या ट्विटनंतर अनोख्या क्रीडांगणाचा हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. या आयडियेवर बच्चे कंपनीही जाम खूश झाली आहेत. कारण त्यांना टीव्हीपासून लांब नेणारा खेळ खेळण्यासाठी जागा मिळाली आहे. अन् ती चक्क मोफत. काय आहे हा प्रकार जाणून घेऊ या.
Transformational. Let’s do this. In every city. pic.twitter.com/4GJtKoNpfr
हे सुद्धा वाचा— anand mahindra (@anandmahindra) March 28, 2023
काय आहे ही आयडिया
मुंबई एक बेटाचे शहर. शहरातील जागेला सोन्याचे भाव. देशाची आर्थिक राजधानी मुंबई. यामुळे शहरात जागा शिल्लक नाही. परंतु काही करण्याची जिद्द आणि कल्पनाशक्ती असली तर नवीन्याचा शोध लागू शकतो. नवी मुंबईत (Navi Mumbai) उभारण्यात आलेले एक अनोखं प्ले ग्राउंड पाहून तुम्हाला हे पटणार आहे. हे क्रीडांगण चक्क एका पुलाच्या खाली आहे. मग या पुलाखाली मुलं बॅडमिंटन खेळताय, आयपीएलचा सामना सुरु होण्यापूर्वी क्रिकेट (Cricket) खेळताय. बास्केटबॉल खेळण्याचा आनंद लुटताय.
महिंद्र यांनी आवडली आयडिया
पुलाखाली प्ले ग्राउंड तयार करण्याची आयडिया उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना जाम आवडली. मग नेहमीप्रमाणे त्यांनी प्ले ग्राउंडचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये युवक नवी मुंबईत पुलाखाली तयार करण्यात आलेल्या ग्राउंडबाबत माहिती देताना दिसत आहे. तो म्हणतो, मी नवी मुंबईमध्ये आहे. आम्ही पुलाखाली खेळ खेळतोय वरतून गाड्या जात आहेत. आमचा बॉलही बाहेर जात नाही. कारण नेट लावली आहे. आम्ही येथे क्रिकेट, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळू शकतो. या प्ले ग्राउंडवर फ्री एन्ट्री आहे. तुमच्या शहरात असे काही आहे का’
काय म्हणाले आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा यांना नवी मुंबईतील ही कल्पना चांगलीच भावली. यामुळे पुलाखाली तयार केलेल्या प्ले ग्राउंडचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलं, ‘ट्रान्सफॉर्मेशनल, हे प्रत्येक शहरात करुयात’