PM Narendra Modi : त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा सरकारला फायदा होईल, नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं अभिनंदन

एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पार्टीने मला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

PM Narendra Modi : त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा सरकारला फायदा होईल, नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं अभिनंदन
देवेंद्र फडणवीस/नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:01 PM

नवी दिल्ली/मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा महाराष्ट्रातील सरकारला फायदा होईल, असे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. हे सर्वच अनपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. आधी सरकारबाहेर राहून सरकारला सहकार्य करणार असे फडणवीस म्हणाले होते. मात्र नंतर पक्षाने त्यांना नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यास सांगितल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे.

‘महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत कराल’

भाजपातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, की अभिनंदन श्री @Dev_Fadnavis ji. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण शपथ घेतली. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपण प्रेरणास्थान आहात. तुमचा अनुभव आणि कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती असेल. मला खात्री आहे, की आपण महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत कराल, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘पक्षाचा आदेश शिरोधार्य’

एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पार्टीने मला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमधूनही देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.