श्री स्वामी समर्थांचं अक्कलकोट पासून ते नाशिकचं रामकुंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात ‘या’ तीर्थक्षेत्रांचा उल्लेख
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबईत (Mumbai) वंदे भारत ट्रेनचं (Vande Bharat Train) उद्घाटन झालं. मोदी यांनी आज मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असेलेल्या अनेक देवस्थानांचं नाव घेतलं. यामध्ये श्री स्वामी समर्थ यांचं अक्कलकोट, सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज, पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, नाशिकचे रामकुंड, पंचवटी आणि शिर्डीच्या साईबाबांचा उल्लेख केला.
“वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला फायदा होणार आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल, नाशिक येथील रामकुंडाला जायचं असेल, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी क्षेत्राचं दर्शन करायचं असेल तर वंदे भारत ट्रेनमुळे हे सगळं खूप सोपं होणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
अशाचप्रकारे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि आई तुळजाभवनीचं दर्शनासाठी सगळं सोपं होणार आहे, असा दावा मोदी यांनी केला.
मला माहिती आहे, जी वंदे भारत ट्रेन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून जाईल तेव्हा प्रवाशांना अद्भूत निसर्गसौंदर्याचा अनुभव होईल. मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना वंदे भारताच्या ट्रेनसाठी मनपूर्वक अभिनंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी आणखी काय-काय म्हणाले?
रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होतेय. देशाला आज नऊवी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला आज अत्यंत आनंद होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व बंधू-बघिणींनो आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबई-महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे.
आज पहिल्यांदाच मुंबईत दोन वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. या वंदे भारत ट्रेन पुणे आणि मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक सेंटरना मोठ्या केंद्रांना जोडेल. यामुळे कॉलेजला ये-जा करणारे विद्यार्थी, ऑफिसला ये-जा करणारे कर्मचारी, शेतकरी आणि भाविकांसाठी सर्वांना सुविधा होईल.
मला माहिती आहे, जी वंदे भारत ट्रेन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून जाईल तेव्हा प्रवाशांना अद्भूत निसर्गसौंदर्याचा अनुभव होईल. मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना वंदे भारताच्या ट्रेनसाठी मनपूर्वक अभिनंदन करतो.
वंदे भारत ट्रेन ही आजच्या आधुनिक भारताची खूप सुंदरस प्रतिमा आहे. ती भारताचा वेग, स्केल या दोघांचा प्रतिबिंब असेल. देश किती वेगाने वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. आतापर्यंत अशा 10 ट्रेन देशभरात चालू झाल्या आहेत. आज देशभरातील 17 राज्यांचे 108 जिल्हे वंदे भारत ट्रेनसे कनेक्ट झाले आहेत.
मला आठवतं की, एक काळ असाही होता की खासदार पत्र पाठवायचे आणि आमच्या रेल्वे स्टेशनला ट्रेनला थांबा द्या, अशी विनंती करायचे. दोन मिनिटासाठी थांबा द्या, अशी विनंती करतात. आता देशभरातील खासदार एकत्र जमतात तेव्हा एकच मागणी करतात की आमच्या इथेही वंदे भारत ट्रेन चालवली जावी. वंदे भारत ट्रेनची ही क्रेझ आहे.
मला खूशी आहे की, आज मुंबईतल्या लोकांचं जीवन सोपं होणार आहे. तसे प्रोजेक्ट इथे सुरु झाले आहेत. आज ज्या एलिवेटेड कॉरिडोअरचं लोकार्पण झालंय त्याने मुंबईच्या इस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटीच्या गरजांना पूर्ण करणार. मुंबईकरांना त्याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. या कॉरिडोअरने दररोज दोन लाख वाहनं प्रवास करतील आणि वेळेचं देखील बचत होईल. मी मुंबईकरांना या योजना पूर्ण झाल्यावर विशेष शुभेच्छा देईन.