Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोकांतिका ! हजारो रसिकांच्या मनावर राज्य करणारा गझलकार लॉकडाऊनमध्ये 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर

कामधंदा नाही, पैसा नाही, घरभाडे भरता येत नाही म्हणून आपल्या 90 वर्षांच्या आईला घेऊन वसईच्या रस्त्यावर येण्याची नामुष्की गझलकारावर आली (Poet Madan Kajale facing financial distress).

शोकांतिका ! हजारो रसिकांच्या मनावर राज्य करणारा गझलकार लॉकडाऊनमध्ये 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर
गझलकार मदन काजले
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:19 PM

वसई विरार (पालघर) : ‘तुझ्या हसण्याचे दिवाणे किती, तुझे चाहते कोण जाणे किती’, अशी गझल गात हजारो रसिकांच्या मनावर राज्य करणारा, अनेक दिग्गजांबरोबर गेली कित्येक वर्ष सिनेसृष्टी गाजवत उर्दू गजलमध्ये मराठीचा डंका मिरवणारा, विदर्भातील गझलकार मदन काजले यांना लॉकडाऊनने रस्त्यावर आणले आहे. कामधंदा नाही, पैसा नाही, घरभाडे भरता येत नाही म्हणून आपल्या 90 वर्षांच्या आईला घेऊन वसईच्या रस्त्यावर येण्याची नामुष्की या गझलकारावर आली. या गझलकाराला सध्या बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे. सरकारने कलाकारांना उपजीविकेचे साधन निर्माण करून द्यावे, अशी आर्त हाक या गझलकाराने दिली आहे (Poet Madan Kajale facing financial distress).

आपल्या सुमधुर आवाजाने गझल गाणारे 54 वर्षाचे मदन काजळे हे विदर्भातील अकोला येथील धोत्रा गणेशपूर या गावचे आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने घरभाडे भरणेही शक्य नाही. त्यामुळे हजारो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला गझलकार वसईतील रस्त्यावर 90 वर्षांच्या आईसोबत मदतीच्या प्रतीक्षेत आहे. कुणी काम देते का काम? अशी भावनिक सादही ते सर्वाना घालत आहेत (Poet Madan Kajale facing financial distress).

मदन काजले यांच्याविषयी माहिती

लहानपणापासून त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. त्यांनी सुरेश वाडकर, देवकी पंडित यांच्यासोबत देखील काम केले आहे. तसेच त्यांनी जीवनगौरव पुरस्कार सन्मानित श्रीकृष्ण राऊत यांच्या रचना देखील गायल्या आहेत. 2010 साली त्यांना सुरेश भट स्मृती पुरस्कार मिळाला हे ते अभिमानाने सांगतात. मेहंदी हसन, मन्ना डे, मोहम्मद रफी, किशोर कुमार, उदित नारायण, रुपकुमार राठोड यांच्यासह अनेक गीतकारांची गाणी ते आपल्या आवाजात सादर करतात.

विदर्भातील वडिलांनी जमीन जुमला विकला, वडिलांचं छत्र गेले त्यानंतर आई गोदावरी काजळे (90) यांना घेऊन मदन यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईत अनेक कार्यक्रम करताना संगीत विशारद व उर्दू गझल हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याने त्यांनी क्लासेस घ्यायला सुरवात केली. अकोला, अमरावती, मुंबईसह गाण्याच्या कार्यक्रमासाठी दौरे देखील केले. काही काळानंतर ते मीरा भाईंदर येथे राहण्यास आले. त्यांनी इथे 15 वर्ष वास्तव्य केले. पण तेथील भाडे जास्त असल्याने त्यांनी वसई निर्मळ याठिकाणी भाडेतत्वावर घर शोधले. ते गेल्या तीन वर्षांपासून पासून या ठिकाणी राहत होते. पण या काळात त्यांना पैशांची चणचण भासू लागली.

वसईकरांना मदतीचा हात देण्याची विनवणी

कोरोनाकाळात काम मिळाले नाही. भाडे भरता न आल्याने रस्त्यावर राहण्याची वेळ आली. जे मिळेल ते खाऊन पोट भरले. याच दरम्यान महापालिकेचे सभापती पंकज चोरघे यांनी त्यांची विचारपूस केली व उघड्यावर राहू नये यासाठी निवारा केंद्राची मदत घेतली. पालिकेच्या सहाय्यक आयुक्त धनश्री शिंदे, दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर व्यवस्थापिका विभा जाधव, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेऊन त्यांना आधार दिला आहे. निवारा केंद्रात आल्यावर त्यांनी गझल सादर केली. त्यामुळे वातावरण प्रफ्फुलीत झाले. शेवटी त्यांनी ‘हम तेरे शहर मे’, ‘आई है मुसाफिर की तरह’, ‘फिर एक मुलाखत का मोका दे दे’ ही गझल गुणगुणत वसईकरांना मदतीचा हात देण्याची जणूकाही विनवणी केली.

कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षापासून कामधंदा नाही. संगीताच्या क्लासला कोणी येत नाही त्यामुळे घराचे भाडे देऊ शकले नाही. त्यामुळे 90 वर्षांच्या आईसोबत 15 दिवसांपासून गझलकाराला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेने निवारा केंद्रात आसरा दिल्याने गझलकार आपल्या आईला घेऊन राहत आहेत.

आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मदतीचा हात

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. त्यांनी कपडे, राशन आणि उदरनिर्वाह करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू दिल्या आहेत. पण हजारो रसिकांच्या मनावर राज करणाऱ्या गझलकारावर 90 वर्षांच्या आईला घेऊन, रस्त्यावर, निवारा केंद्रात बिकट अवस्थे दिवस काढावे लागतात, ही मोठी शोकांतिका आहे. सरकारने अशा कलाकारांना तात्काळ मदत करून त्यांची कला जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यावी हीच अपेक्षा या कलाकारांची आहे. सरकार काय निर्णय घेते हे आता पाहावे लागणार आहे.

हेही वाचा : उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांना काढलं बाहेर

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.