लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या सराईत टोळीतील चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे (Gang looted passengers with a pretend lift).

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 9:12 PM

नवी मुंबई : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या सराईत टोळीतील चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे Gang looted passengers with a pretend lift). याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिग्नेश शहा यांनी 19 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आरोपींवर कलम 392 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सात दिवसाच्या आत सापडा रचत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना आरोपींकडे एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक चाकू ही हत्यारे मिळाली आहेत. हे सर्व हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

तक्रारदार जिग्नेश शहा यांचं घर डोंबिवलीला आहे. ते 18 फेब्रुवारी रोजी घनसोली येथून घरी जायला निघाले होते. यासाठी शहा घनसोली रेल्वे स्थानकासमोरील सर्विस रोडवर आले. तेथून शेअर टॅक्सीने प्रवास करुन घरी जाऊ, असा त्यांचा विचार होता. सर्विस रोडवर आल्यावर त्यांनी एका पांढऱ्या रंगाच्या मारुती इको गाडीमध्ये चालक आणि तीन प्रवासी बसलेले पाहिले. जिग्नेश त्यागाडीत बसले. दरम्यान, अर्ध्या वाटेवर आरोपींनी त्यांना पिस्तूलीचा धाक दाखवत त्यांच्याजवळी सर्व पैसे हिसकावून घेतले.

आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी शहा यांच्याजवळील एक्सिस, एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्डही हिसकावून घेतले आणि दम देत पिन नंबर मागितला. त्यानंतर आरोपींनी तुर्भे एमआयडीसी परिसरातील एटीएममध्ये जाऊन 36000 रुपयांची रोख रक्कम काढली आणि शहा यांना म्हापे परिसरात शीळ फाटा रोडवर सोडून दिले.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ एमआयडीसी परिसरात तपास सुरु केला. तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली. पोलिसांनी वारंवार घणसोली रेल्वे स्थानक समोरील सर्विस रोडवर सापळा रचत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रयत्नात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांना मारुती इको या गाडीसह आरोपी सापडले. या चौघांकडे हत्यारेही सापडली. पोलिसांनी ही हत्यारं जप्त केली आहेत Gang looted passengers with a pretend lift).

या आरोपींना न्यायालयाने 29 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झालं आहे. यातील मुख्य आरोपीवर 2014 साली नाशिक येथे दरोड्यात सहभागी असल्याचा तर एकावर धुळे येथे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या इको गाडी त्यांनी घणसोली परिसरातून चोरी केल्याचे उघड झालं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.