हायप्रोफाइल सीएचा व्हिडिओ बनवून पैशांची मागणी करणाऱ्या तीन समलिंगींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एका हायप्रोफाइल (High profile) तरुणाला धमकी देऊन पैशांची मागणी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसां(Malvani Police)नी तीन आरोपींना अटक केली आहे. समलिंगी (Gay) व्यक्तींशी संबंध ठेवणारे हे सर्वजण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

हायप्रोफाइल सीएचा व्हिडिओ बनवून पैशांची मागणी करणाऱ्या तीन समलिंगींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मालवणी पोलिसांकडून अटक करण्यात आलेले तीन आरोपी
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:04 AM

मुंबई : एका हायप्रोफाइल (High profile) तरुणाला धमकी देऊन पैशांची मागणी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसां(Malvani Police)नी तीन आरोपींना अटक केली आहे. समलिंगी (Gay) व्यक्तींशी संबंध ठेवणारे हे सर्वजण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. Grindr या गे अॅपद्वारे चॅट करून तरुणांशी ते अनैतिक संबंध ठेवायचे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. संबंधित हायप्रोफाइल तरुणाच्या तक्रारीनंतर यातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी होते संपर्कात

पोलिसांनी सांगितलं, की ग्राइंडरअॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर त्या भागातल्या सर्व समलिंगी मुलांचा तपशील त्यात येतो. मग आपल्या लोकेशन असलेल्या भागात एकमेकांशी ते संपर्क साधत असतात. संबंधित तरुणही या अॅपद्वारे एकमेकांशी संपर्कात राहिले. आधी गप्पा आणि नंतर अनैतिक संबंध असा हा प्रकार घडला.

चॅटिंगनंतर झाली भेट

मालवणीचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांनी सांगितलं, की 17 जानेवारीच्या रात्री एका हाय-प्रोफाइल मुलाचे आरोपींशी ‘गे अॅप’द्वारे संबंध आले, काही दिवस ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर आरोपीनं त्याला भेटण्यासाठी बोलावलं. जेव्हा पीडित तरूण त्यांला भेटायला गेला, तेव्हा आरोपींनी 5 तरुणाशी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करायला सुरुवात केली,

मारहाण करून पैशांची मागणी

तरुणानं हे करण्यास नकार दिल्यावर आरोपीनं त्याला मारहाण केली. त्याचा आयफोन, डेबिट कार्ड, रोख रक्कम हिसकावून घेतली. तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला, सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या नावाखाली 50 हजारांची मागणी सुरू केली.

तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

या घटनेनंतर तरुणानं मालवणी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सध्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे,

1. इरफान फुरकान खान (वय 26 वर्ष) 2. अहमद फारुख शेख (वय 24 वर्ष) 3. इम्रान सफिक शेख (वय 20 वर्ष)

Delhi Crime : महिलेचे शीर व हातपाय तोडून धड रस्त्यावर फेकले, दिल्लीमध्ये क्रूरतेचा कळस

Pimpari-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 21 वर्षांचा नराधम गजाआड

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, आरोपी तरुणाला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.