Police Bharti 2024 : पोलीस भरतीला पावसाचा अडथळा; अनेक ठिकाणी मैदानी चाचणीला खोडा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली अशी महत्वाची माहिती

Devendra Fadnavis : मोठ्या प्रतिक्षेनंतर पोलीस भरतीचा बिगुल एकदाचा वाजला. पण अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पोलीस भरतीच्या प्रक्रियेवर पाणी फेरले गेले. मैदानावर चिखल झाल्याने मैदानी चाचणीला अडथळा येत आहे.

Police Bharti 2024 : पोलीस भरतीला पावसाचा अडथळा; अनेक ठिकाणी मैदानी चाचणीला खोडा, देवेंद्र फडणवीस यांनी दिली अशी महत्वाची माहिती
पोलीस भरती पुढे ढकलली, काय महत्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 3:58 PM

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीचे पण लवकरच पडघम वाजतील. राज्य सरकारने भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या तोंडावर सुरु केली. पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे मैदानावर चिखल झाला. जिथे पाऊस पडला तिथे पोलीस भरती प्रक्रियेला ब्रेक लागला.

काय म्हणाले फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व स्थितीचा आढावा घेत पोलीस भरतीविषयी भाष्य केले आहे.राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली तर मुलांचे वय निघून जाईल. सेकंड चान्स मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी पाऊस आहे, तिथे चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे चाचण्या सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक ठिकाणी मुलांची भाऊगर्दी उसळली आहे, अशी ठिकाणी व्यवस्था करण्यात सांगण्यात आले आहे. मंगलकार्याल अथवा योग्य ठिकाणी अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या संकेतस्थळावर माहिती

नांदेड पोलीस दलातील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू झाली. 134 जागेसाठी 15 हजार 200 अर्ज आले आहेत. आज मैदानी चाचणी होणार होती परंतु पाऊस पडल्यामुळे ही चाचणी पुढे ढकलन्यात आली आहे. आज ज्याची चाचणी होती त्यांना पुढील तारीख देण्यात येणार आहे. या विषयीची सर्व माहिती ही नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.

भरतीसाठी लाखो उमेदवार

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे. त्यात अनेक ठिकाणी पावसामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.