अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनस बाहेर रोखलं

वांद्रे टर्मिनस येथून श्रमिक ट्रेनने उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या भेटीसाठी गेलेल्या अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी रेल्वे स्थानकाबाहेरच रोखलं (Police not allowed Sonu Sood to meet Migrants at Bandra terminus).

अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनस बाहेर रोखलं
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 11:33 PM

मुंबई : वांद्रे टर्मिनस येथून श्रमिक ट्रेनने उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या भेटीसाठी गेलेल्या अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी रेल्वे स्थानकाबाहेरच रोखलं (Police not allowed Sonu Sood to meet Migrants at Bandra terminus). त्यामुळे सोनू सूदला मजुरांना न भेटताच वांद्रे टर्मिनसच्या बाहेरुनच प्रवाशांचा निरोप घेऊन परतावं लागलं.

वांद्रे टर्मिनसवरुन आज रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रमिकांची विशेष ट्रेन उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली. या ट्रेनने उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या भेटीसाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस येथे जाणार होता. सोनू सूद मजुरांच्या भेटीसाठी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखलं. त्यामुळे मजुरांना न भेटताच सोनू सूद परतला.

अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना आपापल्या घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे (Police not allowed Sonu Sood to meet Migrants at Bandra terminus).

सोनू सूदच्या कामावर ‘सामना’त उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हावरुन भाजप-मनसेसह काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले होते. यानंतर सोनू सूद काल (रविवार 7 जून) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’वर गेला होता. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली.

या भेटीचा फोटो ट्विट करत “एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी “अखेर सोनू सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला..मातोश्रीवर पोहोचले”, असे ट्विट करत त्यांना टोला लगावला.

दरम्यान, या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूद मदत करण्यासाठी समोरुन पुढे आला असेल तर त्याला प्रोत्साहन देवून मदत करुन घेतली पाहिजे. याशिवाय याप्रकरणी राजकारण करणे चुकीचे आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. या सर्व राजकीय घडामोडींनंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रमिकांच्या भेटीसाठी वांद्रे स्थानकावर गेलेल्या सोनू सूदला पोलिसांनी रोखलं.

रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?

“एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.” अशी टीका ‘सामना’तून झाली. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)

संबंधित बातम्या :

‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट

राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे

सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न, ‘सामना’तून सोनूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

चांगलं काम करणारे भाजपमध्येच हा शिवसेनेचा ठाम विश्वास, सोनू सूद प्रकरणावरुन फडणवीसांचा चिमटा

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.