रेल्वेच्या जागेवरील झोपु योजनेसाठी धोरण निश्चित करावे, खासदार राहुल शेवाळे यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई आणि आसपासच्या शहरातील रेल्वे रुळालगतच्या आणि रेल्वेच्या जागांवरील झोपडपट्टीवासीयांना आणि अन्य बांधकामांना रेल्वेच्या वतीने अतिक्रमण निष्कासनाच्या नोटिसा गेल्या महिन्यात बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

मुंबई : मुंबई आणि इतर शहरातील रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयातून धोरण निश्चित करावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली. संबंधित विषयासंदर्भात शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार गजानन किर्तीकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, खासदार राजेंद्र गावित, खासदार मनोज कोटक, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Policy should be formulated for sleeping scheme on railway site, Mp Rahul Shewale)
रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांना निष्कासनाच्या नोटिसा बजावल्या होत्या
मुंबई आणि आसपासच्या शहरातील रेल्वे रुळालगतच्या आणि रेल्वेच्या जागांवरील झोपडपट्टीवासीयांना आणि अन्य बांधकामांना रेल्वेच्या वतीने अतिक्रमण निष्कासनाच्या नोटिसा गेल्या महिन्यात बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निवेदनात, गेल्या 50 वर्षापासून रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीवासियांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कायमस्वरूपी घरे देण्यासाठी धोरण निश्चित करण्याची आणि तोवर निष्कसनाची कारवाई तात्पुरती स्थगित करण्याची विनंती करण्यात आली होती. या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्र्यांनी मुंबईत विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाचे रेल्वेमंत्र्यांना लेखी निवेदन
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रेल्वेच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्टी धारकांना ‘ प्रधानमंत्री आवास योजने ‘ त सामावून घेण्यासाठी केंद्रीय स्तरावर नवे धोरण तयार करण्याची विनंती शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच नवे धोरण जाहीर करून बाधित झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई स्थगित करावी, अशीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, राजन विचारे, कृपाल तुमाने, राजेंद्र गावित यांचा समावेश असून त्यांनी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या निवेदनाला रेल्वे राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि अन्य शहरातील रेल्वेच्या जागेवर वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना दिलासा मिळणार आहे. (Policy should be formulated for sleeping scheme on railway site, Mp Rahul Shewale)
इतर बातम्या