Aaditya Thackeray | ‘वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे….’, भाजपाच्या मोठ्या नेत्याचा ठाकरे गटाला सवाल

Aaditya Thackeray | "अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?" असा सवाल विचारलाय. वाघनखांवरुन आदित्य ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता. आता या विषयावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु झालय.

Aaditya Thackeray | 'वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे....', भाजपाच्या मोठ्या नेत्याचा ठाकरे गटाला सवाल
wagh nakh
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 1:47 PM

मुंबई : वाघनखं लवकरच भारतात येणार आहेत. वाघनखं ही महाराष्ट्राचा श्रीमंत इतिहास आणि पराक्रमाची साक्षीदार आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अफजल खानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता. याच वाघनखांवरुन आता महाराष्ट्रात राजकारण सुरु झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न विचारला होता. त्यावर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधलाय. आशिष शेलार यांनी काय म्हटलय? त्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरुन काय मुद्दा उपस्थित केलेला ते जाणून घेऊया.

“वाघनखं परत आणणार असं आम्हाला सांगितलं होतं. राज्य सरकारकडून यावर मला स्पष्टीकरण पाहिजे. छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांशी खेळ कुठेही नको. म्हणून स्पष्टपणे दोन-तीन प्रश्न विचारतो” असं आदित्य ठाकरे शनिवारी म्हणाले. “व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयाच्या वेबसाइटवर सांगितलय की, ही वाघनखं जेम्स ग्रॅण्ड डफ हे इतिहासाकार होते, त्यांच्या कलेक्शनमधली आहेत. जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं महाराजांनीच वापरली. पण व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझिमच्या वेबसाइटवर म्हटलय की, महाराजांनीच ही वाघनखं वापरली हे सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठही नको, स्पष्टीकरण हवय” असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर आशिष शेलार यांनी आता उत्तर दिलय.

इथले नकली वाघ का बिथरले?

वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे. आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय. “आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय” असं आशिष शेलार म्हणाले.

आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?

“इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?. महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय?. आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का?. यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात?. अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का?अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?” अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.