मोठी बातमी ! मध्यरात्रीपासूनच बत्तीगुल, अनेक जिल्हे अंधारात, कुठे काय परिस्थिती?; वाचा एका क्लिकवर

अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबत बाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतला आहे.

मोठी बातमी ! मध्यरात्रीपासूनच बत्तीगुल, अनेक जिल्हे अंधारात, कुठे काय परिस्थिती?; वाचा एका क्लिकवर
राज्यात अनेक भागात मध्यरात्रीपासूनच बत्तीगुल, कुठे कुठे काय परिस्थिती?; वाचा एका क्लिकवरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 7:57 AM

मुंबई: महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागात हेच चित्रं सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसत असून अजून दोन दिवस काढायचे कसे? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.

बदलापूर, अंबरनाथच्या काही भागात मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच बत्तीगुल झाली आहे. बदलापूरच्या बेलवली, मांजर्ली, चिखलोली, अंबरनाथच्या चिखलोली, सर्वोदयनगरसह इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ-बदलापूरमधील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. इन्व्हरटरही बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सातारा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. मध्यरात्री 3 वाजल्यापासून वीजपुरवठा आहे बंद. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्याने साताऱ्यातील बत्तीगुल झाली आहे. महावितरणचे खासगीकरण करू नये यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपाची घोषणा केली होती. महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबत बाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.

नागपुरात रात्री 12 वाजता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संप पुकारला. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संपावर गेले आहेत.

संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी असल्याचा दावा जात आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील वीज पुरवठा आणि वीज निर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे शहरात अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. सन सिटी, सिंहगड रोड, शिवणे भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब झाली आहे. काल रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे रात्री 3 वाजल्यापासून शहरातील अनेक ठिकाणी वीज गायब झाली आहे.

वाशीम शहरातील विद्युत पुरवठा मध्यरात्री 1 वा खंडित झाला. अचानक वीज गेल्यामुळे सर्व शहर अंधारात बुडाले. दरम्यान हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्री विजेवर चालणाऱ्या फॅन आणि इतर उपकरणांची गरज जाणवली नाही.

मात्र सकाळ झाल्यावरही वीज न आल्याने दिवसभरातील कामावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी चक्क अधिकारी फिडवर जाऊन कामकाज बघत आहेत.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.