राज्याच्या मंत्र्यांना ‘बत्ती गुल’चा फटका, अर्धा तास बंगल्यांमधील वीज पुरवठा खंडित

minister bangolo power cut off: वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता. तासाभराने वीज पुरवठा सुरळीत झाला.

राज्याच्या मंत्र्यांना 'बत्ती गुल'चा फटका, अर्धा तास बंगल्यांमधील वीज पुरवठा खंडित
minister bangolo in mumbai
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 3:48 PM

राज्यभरात उन्हाचा फटका चांगलाच बसत आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.  प्रचंड तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागांत वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नेहमी होत असतात. काही भागांत भारनियमन केले जात असते. त्याविरोधात ग्रामस्थ अनेक वेळा तक्रार करतात. आंदोलनही करतात. परंतु शुक्रवारी राज्याच्या कारभार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यात वीज पुरवठा खंडित झाला. सतत २४ तास वीज पुरवठा मिळणाऱ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित होण्याचा फटका राज्यातील मंत्र्यांनाही बसला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत

शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे नेहमी वातानुकूलीत घरांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घामघूम व्हावे लागले आहे.

पत्रकार परिषद सुरु असताना बत्ती गुल

राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने दक्षिण मुंबई भागात येतात. या भागात बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यावर त्वरित बेस्ट इलेक्ट्रिसिटी विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु अर्धातासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित होता.

हे सुद्धा वाचा

अजित पवार, आदिती तटकरे, शंभूराज देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी वीज पुरवठा खंडित झाला होता. शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्याचा प्रकार घडला. यामुळे बंगल्यामधील वातनुकूलीत यंत्रणेसह सर्वच कामकाज ठप्प झाले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

तासाभराने वीजपुरवठा सुरळीत

मंत्रालयासमोर असलेल्या मंत्रांच्या घरातली गेलेली लाईट एक तासानंतर परत आली. ट्रान्फर्मर ट्रिप झाल्याने केबल खराब झाली होती. त्यामुळे तासाभर मंत्राच्या घरातील बत्ती गूल झालेली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर आता लाईट पूर्वपदावर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.