AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही आता बिहारमध्ये स्वबळावर लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे. काँग्रेस-राजद यांच्या आघाडीकडून समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं पटेल यांनी सांगितले.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही आता बिहारमध्ये स्वबळावर लढणार
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 3:59 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर उमेदवार आहेत, असंही पटेल यांनी सांगितले. (Praful Patel said NCP will contest Bihar assembly elections)

राष्ट्रवादी काँग्रेसला बिहार निवडणुकीत युपीएच्या महाआघाडीमध्ये निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, राष्ट्रवादीला समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. बिहारमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. आमच्याकडे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे खासदार सुप्रिया सुळे तसंच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 39 नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होईल. बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परस्परांविरोधात लढणार आहेत. शिवसेनेने बिहारच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली आहे.

शिवसेना 50 जागांवर लढणार

शिवसेनेने बिहार निवडणुकीत 50 जागांवर लढणार आहे. पक्षाकडून 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, जदयूने तक्रार केल्यामुळे शिवसेनेला धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही.

संबंधित बातम्या:

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची फौज सज्ज, शरद पवारांसह स्टार प्रचारकांची यादी जाहीर

एकनाथ खडसे ‘घड्याळाची वेळ’ साधण्याची चिन्हं, 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश?

(Praful Patel said NCP will contest Bihar assembly elections)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.