Yashomati Thakur : प्रज्वला योजनेची चौकशी होणार, ॲड. यशोमती ठाकूर यांची विधानपरिषदेत माहिती
कॅगच्या अहवालानुसार सर्व 288 विधानसभा मतदार क्षेत्रात कार्यक्रम करणे आवश्यक होते. मात्र फक्त 98 क्षेत्रात कार्यक्रम झाले. त्यामुळे या योजनेची चौकशी करण्याची मागणी सन्मानीय सदस्यांनी केली. त्याला उत्तर देताना ॲड. ठाकूर यांनी स्वतंत्र समिती नेमून याची चौकशी करणार असल्याचे सांगितले.
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रज्वला योजने (Prajwala Scheme)त गैरप्रकार झाला असेल तर, त्याबाबत स्वतंत्र चौकशी समितीद्वारे पडताळणी करण्यात येईल. तसेच समितीच्या अहवालानंतर सत्यता पडताळून दोषींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या प्रज्वला योजनेबाबत डॉ. मनीषा कायंदे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये प्रज्वला योजनेबाबत कॅगच्या अहवालात ओढले ताशेरे गेले. (Prajwala scheme will be investigated, Adv. Information of Yashomati Thakur in the Legislative Council)
प्रज्वला योजनेचा स्वार्थासाठी वापर केल्याचा आरोप
राज्य सरकारच्या प्रज्वला योजनेचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला गेला. आयोगाने आपल्या कार्यकक्षा ओलांडून वारेमाप खर्च केला. जो खर्च केला गेला, त्याच्या हस्तलिखित कच्च्या पावत्या सादर केल्या गेल्या. कॅगच्या अहवालानुसार सर्व 288 विधानसभा मतदार क्षेत्रात कार्यक्रम करणे आवश्यक होते. मात्र फक्त 98 क्षेत्रात कार्यक्रम झाले. त्यामुळे या योजनेची चौकशी करण्याची मागणी सन्मानीय सदस्यांनी केली. त्याला उत्तर देताना ॲड. ठाकूर यांनी स्वतंत्र समिती नेमून याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. शिवाय या योजनेत कोणत्याही शासन निर्णयाशिवाय तसेच कोणत्याही अधिकृत प्रक्रियेशिवाय अनेक निर्णय घेतले गेले, ही वस्तुस्थिती असल्याचे ॲड. ठाकूर यांनी स्पष्ट केले.
नंदुरबारमधून झाला होता प्रज्वला योजनेचा प्रारंभ
मागच्या सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रज्वला योजना राबविण्यात आली होती. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात या प्रज्वला योजनेचा शुभारंभ नंदुरबारमधून झाल्यानंतर जळगाव, नाशिक असे केवळ 98 विधानसभा मतदार क्षेत्रात बचत गटातील महिलांचे मेळावे पार पडले होते. (Prajwala scheme will be investigated, Adv. Information of Yashomati Thakur in the Legislative Council)
इतर बातम्या
Osmanabad VIDEO | आक्रमक राणे कुटुंबियांचे पुत्र प्रेम, Nitesh Rane जेव्हा बापाच्या भूमिकेत जातात…