Prasad Lad : माझ्या आईबद्दल विरोधी पक्षनेत्याचे अपशब्द; प्रसाद लाड भावूक, म्हणाले, रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही
Prasad Lad on Ambadas Danve : विधिमंडळात सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन टोकाचे वक्तव्य करण्यात आले. विधानपरिषदेत आई-बहिणीवरून शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. त्यावरून आज पुन्हा गदारोळ झाला.
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील झंझावाती भाषणाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात पण दिसून आले. विधान परिषदेत तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना विरोधाचे भान उरले नाही. विरोध करता करता प्रकरण वैयक्तिक टीकेवर येऊन ठेपले. विधानपरिषदेत आई-बिहिणीवरुन शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस खूप वादळी ठरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड एकमेकांना भिडले. एकमेकांवर ते तुटून पडले. विधानपरिषदेत एकच गोंधळ उडाला. आईबद्दल विरोधी पक्षनेत्याने केलेल्या वक्तव्याने आपल्याला रात्रभर झोप आली नसल्याचे सांगत प्रसाद लाड भावनिक झाले. आजही या प्रकाराचे पडसाद विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिसले. सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन करत हा परिसर दणाणून सोडला.
विरोधी पक्षनेत्याच्या राजीनाम्याची मागणी
माझ्या आईबद्दल एका विरोधी पक्षनेत्याने अपशब्द काढले आहे. उध्दव ठाकरेंना शोभते का? शिव्या देण हे माहाराष्ट्राची संस्कृती आहे का?विरोधी पक्षनेत्याची निंलबन झाले पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा घेतला पाहिजे, माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. उध्दव ठाकरेंनी त्याला जाब विचारला पाहिजे. शिक्षा एका दिवसाची किंवा एका तासाची झाली पाहिजे.
आज काय म्हणाले दानवे?
भाजपने आम्हाला संसदीय नियम आणि कायदे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिली. भारतीय जनता पार्टीच्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं. भारतीय जनता पार्टीने 150 खासदारांना निलंबित केलं होतं. त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा संसदीय नियम आणि कायदे उद्धव ठाकरे आणि मला शिकवण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या. आता त्यांना नियम आणि कायदे संविधान आठवायला लागलेला आहे. इतक्या दिवसांना कायदे म्हणजे त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली आहे. मी शिवसैनिकाच्या बाण्याने त्यांना उत्तर दिल्याचे दानवे म्हणाले. बाटगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का? पक्षात धंद्यासाठी, त्याच्या फायद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्याकडे बोट दाखवून बोलतो. तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. लाड यांना कुणाकडे दाद मागायची ती त्यांनी मागावी, मी पळपुट्टा शिवसैनिक नसल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.
विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी
विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी, दानवे यांच्याविरोधात आज घोषणा केली. सुरुवातीला प्रसाद लाड यांनी एकट्यानेच दानवे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. नंतर सत्ताधाऱ्यांनी राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभा पायऱ्यांवर ठिय्या दिला. आज हा मुद्दा विधानपरिषदेसह विधानसभेत गाजण्याची दाट शक्यता आहे.