पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

पवार-प्रशांत किशोर भेटीत 'मविआ' आणि 'बंगाल मॉडेल'वर चर्चा?; जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर तातडीने दाखल
jayant patil
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 12:33 PM

मुंबई: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने या बैठकीत मोठा निर्णय होण्याचे कयास लढवले जात आहेत. (Prashant Kishor and Sharad Pawar meeting start, jayant patil reached at silver oak)

प्रशांत किशोर यांनी आज अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेटायला आले. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, गेल्या दीड तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू अस्लयाने ही सदिच्छा भेट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

जयंत पाटील का आले?

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पालिका निवडणुका या पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय स्ट्रॅटेजी असावी याची पाटील यांनाही माहिती असावी यासाठी पाटील यांना तातडीने सिल्व्हर ओकवर बोलावून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चर्चा काय?

गेल्या दीड तासांपासून या बैठकीत राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. कोरोना संकटामुळे बदललेली राजकीय परिस्थिती आणि नागरिकांची मानसिकता याविषयीही चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत राज्यात आणि महाराष्ट्रात बंगाल मॉडल लागू करता येऊ शकतं का? तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात किंवा राज्या राज्यांमध्ये लागू होऊ शकतं का? कोणत्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे मॉडल लागू होऊ शकते? त्यासाठी विरोधी विचारधारा असलेले कोणते राजकीय पक्ष जवळ येऊ शकतात, यावरही चर्चा होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नेतृत्व करावं की ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावं, यावरही चर्चा होत असल्यांच सूत्रांचं म्हणणं आहे. (Prashant Kishor and Sharad Pawar meeting start, jayant patil reached at silver oak)

संबंधित बातम्या:

शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचा अजेंडा काय?; ‘ते’ 5 मुद्दे ज्यांच्यावर भेटीत चर्चा होऊ शकते!

मोठी बातमी: प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला, साडेदहा वाजता दोघांचीही भेट होणार, कारण गुलदस्त्यात!

(Prashant Kishor and Sharad Pawar meeting start, jayant patil reached at silver oak)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.