“वाटलं होतं राठोड राजीनामा देतील, हा तर सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”, प्रविण दरेकरांचा घणाघात

संजय राठोड यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला," अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. (Pravin Darekar Sanjay Rathore Pooja Chavan suicide case)

वाटलं होतं राठोड राजीनामा देतील, हा तर सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न, प्रविण दरेकरांचा घणाघात
प्रविण दरेकर आणि संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 2:31 PM

मुंबई : “वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं. मात्र, पूजाचा मृत्यू कसा झाला?, याबाबत काहीही भाष्य केले नाही. समोर येऊन ते प्रायश्चित्त करतील असं वाटलं होतं. ते राजीनमा देतील असंही वाटलं होतं. त्यांनी राजीनामा दिला नाही. उलट त्यांनी समाजमाध्यमांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. तब्बल 16 दिवस अज्ञातवासात असलेले वनंमत्री संजय राठाेड (Sanjay Rathore) आज जनतेसमोर आले. त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी पूजा चव्हाण (Pooja Chavan suicide case) आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले. त्यानंतर दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Pravin Darekar criticizes Sanjay Rathore for disagreeing allegations related to Pooja Chavan suicide case)

सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, “संजय राठोड यांनी फक्त मीडियासमोर येण्याचं नाटक केलं. समाजाचा दबाव निर्माण करुन त्यांनी प्रसारमाध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं की ते प्रायश्चित्त घेतील. राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून सोडवू शकत असल्याचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला कसा झाला?, याबाबत भाष्य केलं नाही. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” असे दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्री बळी पडतायत का?

यावेळी बोलताना प्रविण देरकर यांनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा खोचक टीका केली. “राज्यातील महिला, मुलींच्या मनात याविषयी काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत राज्यातील जनतेच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला हवं. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे,” असे दरेकर म्हणाले.

इतर बातम्या :

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!

स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते, संजय राठोडांच्या मुसक्या आवळून चौकशी करा: चित्रा वाघ

(Pravin Darekar criticizes Sanjay Rathore for disagreeing allegations related to Pooja Chavan suicide case)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.