अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली, प्रविण दरेकरांचा घणाघात
अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी कारवाई
भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व कांही करता येईल.महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठ महामंडळ आहे.त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केलं तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असं दरेकर म्हणाले आहेत.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल असून याची चौकशी झाली पाहिजे, असं दरेकर म्हणाले. एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचं, हे चुकीचं असल्याचं दरेकर म्हणाले.
संजय राऊत यांचं कोणतही रचनात्मक कामाच्या बाबतीतल वक्तव्य माझ्या ऐकिवात नाही. ते केवळ राजकीय टीका टिप्पणी, जुमलेबाजी आणि तुसडेपणानं बोलत राहतात. उपरे टुपरे बोलून आपल्या बोलण्याची हौस भागवून घेण्याचं काम राऊत करतात, असं दरेकर म्हणाले आहेत.
नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत.ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं, असा सवाल दरेकर यांनी केला.
इतर बातम्या:
नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी
Pravin Darekar slam Shivsena and Uddhav Thackeray over st workers strike