AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather forecast: राज्यात पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. | Pre Monsoon Rain

Weather forecast: राज्यात पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 10:18 AM

मुंबई: यंदा देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे आगमन 1 जून रोजी होणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) 10 जूनच्या आसपास दाखल होईल. त्यापूर्वी आता राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. (Pre Monsoon Rain expected in maharashtra)

महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचं संकट

अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला टाँकटाइ असं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये गारपीट

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस कोसळला. या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस सुरु होता. या दरम्यान काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. रामटेक शहरात ही अर्धा तास झालेल्या पावसात दहा मिनिटं मध्यम आकाराची गारपीट झाली. रामटेक आणि कोदमेंडी परिसरता झालेल्या पावसानं आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

स्कायमेटचा अंदाज काय?

स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल. (Pre Monsoon Rain expected in maharashtra)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.