चैत्यभूमीवर सुरक्षाविषयक कामे पूर्ण, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी केली आहे. येथे पुष्प सजावट, सुरक्षाविषयक कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. यावेळी कुमार यांनी थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीदेखील पाहणी केली.

चैत्यभूमीवर सुरक्षाविषयक कामे पूर्ण, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
CHAITYABHUMI MUMBAI
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 6:53 PM

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीचा आढाव घेण्यात आलाय. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी केली आहे. येथे पुष्प सजावट, सुरक्षाविषयक कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. यावेळी कुमार यांनी थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीदेखील पाहणी केली.

सर्व कामे पूर्णत्वास अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच, डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी डॉ. संजीव कुमार यांनी केली. पोलीस प्रशासनाच्या तयारीची पाहणीदेखील त्यांनी पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक यांच्यासह केली.

अनुयायांनी घरी राहूनच अभिवादन करण्याचे आवाहन 

कोविड-19 विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला तरी कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षता बाळगणे आवश्यक झाले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने संक्रमित होणारा कोविड विषाणू प्रकार असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन शासनाकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.