SC final decision on MLA Prakash Surve : यांचा राष्ट्रवादी ते शिवसेना असा प्रवास, आमदारकीवरून न्यायालयाच्या निकालाने धाकधूक वाढली
Supreme Court final decision on Prakash Surve : आता थोड्याच वेळात म्हणजे ११ वाजता या आमदारांची आमदारकी जाणार की, राहणार याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या १६ आमदारांची धाकधूक वाढली आहे.
मुंबई : अकरा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. सत्तेत असूनही ठाकरे गटापासून ते वेगळे झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. भाजपने शिंदे गटासोबत जाऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. यावेळी शिंदे यांच्यासोबत जे १६ आमदार गेले. त्यापैकी एक म्हणजे प्रकाश सुर्वे. सुर्वे हे २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा निवडून आले. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली. आता ठाकरे गटापासून वेगळे झाल्याने ते शिंदे गटात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटातील १६ आमदारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. आता थोड्याच वेळात म्हणजे ११ वाजता या आमदारांची आमदारकी जाणार की, राहणार याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे या १६ आमदारांची धाकधूक वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
धाकधूक वाढली
२०१९ च्या निवडणुकीत प्रकाश सुर्वे यांनी मनसेच्या नयन कदम यांना पराभूत केले. तब्बल ४६ हजार ५४७ मतांनी विजय खेचून आणला. मुंबईतील मागाठाणे मतदारसंघाचे ते आमदार आहेत. प्रकाश सुर्वे हे व्यवसायिक आहेत. बी कॉमपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून त्यांची आमदारकी जाणार की, राहणार हे ठरणार आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.
या १६ आमदारांच्या पात्रतेचा होणार निर्णय
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालात १६ आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.