पाण्यासाठी सुरु केलेले असे आंदोलन कधी पहिलेच नसणार? नेताजींचा फंडा या पद्धतीने वापरला
protest for water in ambernath : पाणीपुरवठ्यासाठी एक आगळेवेगळे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फंड्याचा वापर केला गेला आहे. यामुळे या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र होत आहे. यानंतर तरी पाणी मिळणार का? हा प्रश्न आहे.
निनाद करमरकर, अंबरनाथ : शहरात पाणीपुरवठा होत नसल्यास नगरपालिकेला आणि महानगरपालिकेला निवेदन दिले जातात. स्थानिक नगरसेवकाकडे जाऊन समस्या मांडली जाते. मग त्यानंतरही प्रश्न सुटत नसेल तर हांडा मोर्चा काढला जातो. स्थानिक आमदारांपर्यंत प्रश्न नेला जातो. परंतु या सर्वांपेक्षा वेगळे आंदोलन झाले आहे. या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या आंदोलनात काही घेण्यापेक्षा काही देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाण्यासाठी आपले रक्त दिले आहे.
काय आहे आंदोलन
‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’, असे आंदोलन अंबरनाथमध्ये सुरु केले आहे. काँग्रेसने पाण्यासाठी हे आंदोलन सुरु केले आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चाही काढला आहे. अंबरनाथमधील पाणी समस्येविरोधात काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर हा मोर्चा काढला आहे. सोबतच ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ असं म्हणत पाण्यासाठी रक्तदान शिबिर सुद्धा काँग्रेसने सुरू केलं आहे.
रक्तदान शिबीर घेतले
अंबरनाथ शहराच्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे अखेर काँग्रेसने शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणा देत काँग्रेसने थेट रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं आहे. रक्तदान शिबिरात जमा झालेलं रक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देऊन पाणी मागणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
नेताजींचा वापरला फंडा
काँग्रेसच्या नेतृत्वात सुरु झालेल्या या आंदोलनासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फंडा वापरला आहे. नेताजींनी जसे तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा म्हणत देशवासियांमध्ये जनजागृती केली होती, त्याप्रमाणे ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ असे आंदोलन केले.