कुठे जाळपोळ, तर कुठे जोरबैठका; मराठा आरक्षण आंदोलनात आज दिवसभरात काय काय घडलं?

| Updated on: Oct 31, 2023 | 7:30 PM

मनोज जरांगे पाटील यांचं आजही उपोषण सुरूच आहे. आजपासून मराठ्यांना कुणबींची प्रमाणपत्रे दिली जात आहे. मात्र, तरीही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. आम्हाला सरसकट आरक्षण हवं आहे. अर्धवट आरक्षण नको, असं मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

कुठे जाळपोळ, तर कुठे जोरबैठका; मराठा आरक्षण आंदोलनात आज दिवसभरात काय काय घडलं?
Maratha Protest
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना | 31 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजा सातवा दिवस आहे. अजूनही मराठा आरक्षणावर कोणताच तोडगा न निघाल्याने त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मराठा तरुणांनी राज्यभरात जोरदार आंदोलन सुरूच ठेवलं आहे. कुठे जाळपोळ होत आहे, तर कुठे नेत्यांना अडवलं जात आहे. जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

आज दिवसभरात काय घडलं?

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

मनोज जरांगे पाटील यांचा नोंदीनुसार आरक्षण घेण्यास नकार. सरसकट आरक्षणाच्या मागणीवर कायम

सोलापूर- रेल रोको आंदोलन

मनोज जरांगेंनी घेतलं पाणी, प्रकृती सद्या ठिक

दोन दिवसात अधिवेशन बोलवा, आणि प्रश्न मिटवा, जरांगे यांचं आवाहन

मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन

धाराशिवमध्ये टायर जाळले

हिंगोलीत भाजपा कार्यालय पेटवलं

जालना येथे घनसावंगी पंचायत समिती कार्यालय पेटवलं

नांदेड- हैदराबाद रोडवर रास्ता रोको, माहूरमध्येही चक्काजाम

नांदेडमध्ये गटविकास अधिकाऱ्याची गाडी जाळली

पंढरपूरमध्ये एसटीची जाळपोळ करण्यात आलीय

बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड

जालना येथील तहसील कार्यालय फोडलं

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री रास्ता रोको

धाराशिवमध्ये रेल रोको करण्यात आला

परभणीत रास्ता रोको, रोडवर टायर जाळले, एसटी सेवा बंद

नगर- अकोलेमध्ये कडकडीत बंद पुकारला

साताऱ्यात शांतते बंद

बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू

पुणे- मराठवाड्यात जाणाऱ्या सगळ्या बस सेवा बंद करण्यात आल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली

मुरबाडमध्ये भाजपा आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं.

हिंगोलीत रस्त्यावर काटेरी झाडं टाकून आंदोलन, जेसीबीने रास्ता रोको

यवतमाळमध्ये आंदोलकांचं जलसमाधी आंदोलन

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

सोलापूरमध्ये कलेक्टर ऑफिसला टाळे लावण्यात आले

मुंबईत मराठा तरुणांचं मुंडन आंदोलन

नाशिकच्या चांदवडमध्ये टायर जाळून आंदोलन करण्यात आलं

कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीत अर्ध नग्न आंदोलन करण्यात आलं

बुलडाणा येथे रास्ता रोको करण्यात आला

कराडमध्ये साखळी उपोषण करण्यात आलं

सांगलीत सोन्या बैलाच्या पाठीवर मराठा आरक्षण लिहून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला

नगरमध्ये कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले

आतापर्यंत हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे या दोन खासदारांनी राजीनामे दिले

आतापर्यंत 3 रमेश बोरणारे, लक्ष्णण पवार, सुरेश वरपूडकर या तीन आमदारांनी राजीनामे दिले

पंढरपूर रस्त्यावर दगडे टाकून बसेस अडवल्या. प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बस पेटवून दिली

नागपूरमध्ये बसेस जाळत असल्याने नागपूरातून पुण्यात जाणाऱ्या पाच स्लिपर बसेस परत बोलावल्या

कोल्हापूर आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या

धाराशिव येथील 459 प्रकरणात त्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम आणि कॅम्प घेतले जाणार आहे

नाशिकमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार सरोज अहिरे यांचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू

सोलापुरात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनाच्या जामनेरच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला मराठा क्रांती मोर्चाकडून टाळे ठोकण्यात आले

धाराशिवमध्ये आंदोलकांनी भूम शहरात गोलाई चौक येथे रस्त्यावर उतरत टायर जाळून घोषणाबाजी केली

नाशिकमध्ये आता प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पोलीस बंदोबस्त

मुंबईत मंत्रालयात येणाऱ्यांची कसून तपासणी, सुरक्षा वाढवली

हिंगोलीत महिलांनी हात दांडके घेऊन रास्ता रोको