पुणे, ठाणेकरांसाठी गुड न्यूज, आता तासांचा प्रवास मिनिटांत, 15 हजार कोटींचा हा प्रकल्प
Pune and Thane Metro Project: पुण्यातील कात्रज ते स्वारगेट मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. यामुळे या ठिकाणी भुयारी मेट्रोचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकार करणार आहे.
केंद्र सरकारने पुणे आणि ठाणेकरांसाठी चांगली बातमी दिली आहे. या दोन शहरांमधील नागरिकांचा तासांचा प्रवास मिनिटांत होणार आहे. केंद्र सरकारने या दोन शहरांसाठी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पुणे स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्ग होणार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड ते कात्रज असा तासांचा प्रवास मिनिटांमध्ये होणार आहे. २ हजार ९५४ कोटींचा ५.४६ किलोमीटरचा हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हे प्रकल्प मंजूर झाले.
पुण्यात कात्रज ते स्वारगेट भुयारी मेट्रो
पुण्यातील कात्रज ते स्वारगेट मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. यामुळे या ठिकाणी भुयारी मेट्रोचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकार करणार आहे. मनपाच्या वाटा आता नसणार आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गात मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर, कात्रज ही स्थानके असणार आहेत.
ठाण्यासाठी १२, २०० कोटींचा मेट्रो प्रकल्प
ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. २९ किमी मार्गाचा या प्रकल्पासाठी १२, २०० कोटी खर्च येणार आहे. त्यात २६ किमी उन्नत आणि तीन किमी भूमिगत मार्ग असणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर आहे. तसेच शहरातील विविध भागांशी थेट रिंग मेट्रो मार्गाने प्रवास होणार आहे. दरम्यान, अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साधारणतः सन २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
अशी असणार ठाणे मेट्रो
- २२ स्थानके त्यापैकी २० उन्नत आणि २ भुयारी
- सुमारे १२, २०० कोटी रुपयांचा प्रकल्प
- मेट्रोचे २९ किमी अंतर
- नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागातून मेट्रो धावणार
- प्रकल्पाचा लाभ अंदाजे ६.४७ लाख प्रवाशांना मिळणार