“सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा”; या काँग्रेस नेत्याने विजयाची खात्री दिली…

सध्या देशात वास्तविक पाहता भाजपविरोधी एकजूट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका करणे अपेक्षित नव्हतं असंही त्यानी राव यांच्याबद्दल बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा; या काँग्रेस नेत्याने विजयाची खात्री दिली...
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 11:30 PM

मुंबईः तेलंगणाच्या मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांनी आज नांदेडमध्ये बोलताना काँग्रेसवर टीका केली. त्यावर बोलताना काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार करत के. सी. आर. राव यांच्या काँग्रेसवरील टिकेला गांभीर्याने घेण्याची गरज नसलल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. के. सी. आर. राव यांच्या नांदेडमधील सभेला उपस्थिती कमी होती, त्यामुळे त्यांना त्याच्या सभेसाठी लोकं ही तेलंगणामधून आणावी लागली असा हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

तर दुसरीकडे पुण्याच्या पोटनिवडणुकीविषयी जोरदार चर्चा सुरू असल्याने त्या पोटनिवडणुकीविषयी सर्व पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्याबद्दल काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार याबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितले की, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेदवाराबाबत कोणतीही अडचण नाही. ही पोटनिवडणूक सगळं व्यवस्थित होणार आहे.

त्यामुळे उद्या कसब्याच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरणार असून सर्वांच्या संमतीने उद्या नावाची घोषणा अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर त्याच वेळी त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून तांबे पुतापित्रांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.त्यावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाध्यक्षांनी एबी फॉर्मच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

तर तांबे जे काही म्हणाले होते याबाबतीत अखिल भारतीय काँग्रेसच्या पातळीवर माहिती घेऊन, त्याचा योग्य तो खुलासा पक्षाध्यक्ष करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

के. सी. आर. राव यांच्या बीआरएस पक्षावर टीका करताना त्यांनी नांदेडमधील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला. काँग्रेसमधील काही नेतेत बीआरएसमध्ये सामील झाल्याच्या चर्चा होत्या मात्र तसे काही झाले नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मात्र टीका करताना त्यांनी राजकीय भान ठेवले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या देशात वास्तविक पाहता भाजपविरोधी एकजूट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका करणे अपेक्षित नव्हतं असंही त्यानी राव यांच्याबद्दल बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

त्यांना महाराष्ट्रात यायचे असल्याने काहीतरी त्यांना बोलायचे होते म्हणून आणि काँग्रेस विरोधी वक्तव्य केले असावे असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.