पुणे-मुंबई प्रवास करण्यापूर्वी गाड्या चेक करा, अनेक गाड्या रद्द, कारण…
pune mumbai trains cancel: पुणे, मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन, इंटरसिटी आणि प्रगती एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द केली आहे. सीएसएमटीवरील कामांमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे प्रवास अनेक लोक करतात. दोन्ही शहरात नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पुणे-मुंबई प्रवाशासाठी एक्स्प्रेस वे असला तरी रेल्वे प्रवाशाला अनेक जण प्राधान्य देतात. त्यामुळे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या गाड्या नेहमी भरुन जातात. आता काही दिवसांसाठी काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पुणे, मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन, इंटरसिटी आणि प्रगती एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द केली आहे. सीएसएमटीवरील कामांमुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
काय सुरु होणार काम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर फलाट विस्ताराचे काम करण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १० आणि ११ विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस तर प्रगती सहा दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांची काही दिवस गैरसोय होणार आहे.
रद्द केलेल्या गाड्या
- पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस (28 मे ते 2 जून )
- पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस( ३१ ते २ जून)
- पुणे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस (१ व २ जून)
- पुणे मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस १ व २ जून
- कुर्ला मडगाव कुर्ला (१ व २ जून)
मुंबई, पुणे येथून बालेश्वरपर्यंत उन्हाळी विशेष गाड्या धावणार
मुंबई, पुणे येथून बालेश्वरपर्यंत उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहे. उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई आणि पुणे येथून बालेश्वरदरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवाशांना प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. पहिली गाडी मुंबई- बालेश्वर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी १८ मे रोजी ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई येथून सुटेल… या गाड्यांना मलकापूर येथे ही थांबा मिळाला असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा या गाडीचा दिलासा मिळाला आहे.